आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • These Smartphone Users Will Not Be Able To Use WhatsApp From December, Check List

या Smartphones मध्ये बंद होतेय WhatsApp, पाहा तुमचा तर नाही ना...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप चेक करणे लोकांच्या सवयीचा भाग बनला आहे. परंतु, आता व्हॉट्सअॅपने अशा काही स्मार्टफोनची नवीन यादी जाहीर केली ज्यामध्ये हे अॅप चालणार नाही. वर्षाच्या शेवटपर्यंत या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप बंद होईल. या अॅपला आता नव-नवीन फीचर्स देऊन केले जाणार आहे. या अपडेटचा लाभ काही स्मार्टफोन झेपवू शकणार नाहीत. त्यामुळेच अर्धवट व्हॉट्सअॅप सेवा वापरण्यापेक्षा त्या मोबाईलमध्ये हे अॅपच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणते आहेत ते स्मार्टफोन आणि व्हॉट्सअॅपचे काय म्हणणे आहे हे आपण जाणून घेत आहोत. 


व्हॉट्सअॅप म्हणे...
कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, याच वर्षाच्या शेवटी व्हॉट्सअॅपमध्ये अभूतपूर्व अपडेट्स टप्प्या-टप्प्याने येत आहेत. त्याचे फीचर सर्वच स्मार्टफोनमध्ये चालू शकत नाहीत. त्यामुळे, अशा स्मार्टफोनला व्हॉट्सअॅपच्या सुविधा बंद केल्या जाणार आहेत. किंवा काही ग्राहकांना त्यांच्या मोबाईलचे ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करण्यास सांगितले जाणार आहे. जेणेकरून ते यापुढे सुद्धा व्हॉट्सअॅपचा अखंडित वापर करू शकतील. आता प्रश्न पडतो की ते स्मार्टफोन नेमके कोणते, ज्यामध्ये व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. 


Android स्मार्टफोन्सची यादी...
भारतासह जगभरात सर्वात जास्त वापरले जाणारे मोबाईल ऑपरेटिंग सिस्टिम म्हणजे Android होय. या वर्षीच्या शेवटपर्यंत अर्थात डिसेंबरपर्यंत Android 2.1 आणि 2.2 OS असलेल्या मोबाईलवर WhatsApp चे अपडेट पूर्णपणे बंद होतील. सोबतच, Android 2.3.7 हे ओएस असलेल्या मोबाईलवर पुढील फक्त 2 वर्षे व्हॉट्सअॅप वापरता येणार आहे. यानंतर त्यांचे देखील व्हॉट्सअॅप बंद होईल.


iPhone वाल्यांनाही बदलावे लागतील स्मार्टफोन
या नवीन अपडेटचा फटका केवळ Android नव्हे, तर Apple वाल्यांना सुद्धा बसणार आहे. कंपनीने जारी केलेल्या यादीनुसार, या वर्षाच्या शेवटी iPhone 3Gs आणि IOS 6.0 पर्यंत ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप चालणार नाही. अर्थातच त्यांना व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टिम 6 च्या पुढचे व्हर्जन अपडेट करावेच लागेल अन्यथा फोन बदलावा लागेल. 


Nokia ला सुद्धा फटका....
एकेकाळी जगातील सर्वात लोकप्रीय मोबाईल ब्रँड राहिलेल्या नोकियाच्या S40 सिरीझ ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप चालणार नाही. सोबतच ASHA सिरीझ स्मार्टफोन असलेल्यांना आपल्या फोनमध्ये नवीन व्हॉट्सअॅप अकाउंट बनवता येणार नाही. त्यांनी एकदाचा व्हॉट्सअॅप डिलीट केल्यास तो पुन्हा Verify सुद्धा होणार नाही. नोकियाच्या Symbian फोनमध्ये सुद्धा व्हॉट्सअॅप चालणार नाही. 


Blackberry
ब्लॅकबेरी स्मार्टफोनमध्ये ऑपरेटिंग सिस्टिम 10 किंवा त्यापेक्षा कमी व्हर्जन असेल तर फोन बदलण्याची वेळ आली आहे. डिसेंबरनंतर या स्मार्टफोन ग्राहकांना 2 आठवड्यांचा ग्रेस पीरियड दिला जाणार आहे. पण, पुढे काय हे अद्याप स्पष्ट नाही. 


Windows स्मार्टफोन
Windows OS 7 वापरणाऱ्यांना आधीच व्हॉट्सअॅप वापरण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे. पण, आता आपल्याकडे 8.0 ओएस असेल तरीही यापुढे व्हॉट्सअॅप चालणार नाही. या स्मार्टफोनमध्ये आधीच असलेला व्हॉट्सअॅप सुद्धा बाद होईल. 

बातम्या आणखी आहेत...