आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Forbes: युट्यूबमधून कमाई करणारे टॉप-10 सेलिब्रिटी, लिलीसिंगही लिस्ट आऊट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- फोर्ब्स मॅग्झिनने युट्यूबमधून कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. The Highest Paid YouTube Stars 2017 नावाच्या या लिस्टमध्ये ब्रिटिश मिनीक्राफ्ट प्लेअर डॅनिअल मिडल्टन पहिल्या स्थानावर आहे. तिने युट्यूबमधून या वर्षी १.६५ कोटी डॉलर म्हणजेच १०७ कोटी रुपये कमाई केली आहे.

 

फोर्ब्सने सांगितले, की तुम्ही त्यांना कधी रेड कार्पेटवर बघितले नसेल, पण युट्यूबवर तब्बल १.७ कोटी लोक तिला फॉलो करतात. मिडल्टनची ही कमाई कोणत्याही युट्यूब युझर किंवा व्यावसायिकाच्या कमाई पेक्षा जास्त आहे. फोर्ब्सने २०१५ पासून अशी लिस्ट जाहीर करण्यास सुरवात केली आहे.

 

टॉप-१० लोकांनी कमविले १२.७ कोटी डॉलर
या वर्षी फोर्ब्सच्या टॉप-१० सेलिब्रिटींनी एकूण १२.७ कोटी डॉलरची कमाई केली आहे. जून २०१६ पासून जून २०१७ पर्यंत झालेल्या उत्पन्नाच्या बेसिसवर ही लिस्ट तयार करण्यात आली आहे. फोर्ब्सने YouTube, Social Blade and Captiv8 यापासून मिळालेल्या डाटाच्या आधारावर ही लिस्ट तयार केली आहे.

 

लिलीसिंगचेही नाव
भारतीय वंशाची अमेरिकी लिलीसिंग हिला टॉप-१० मध्ये जागा मिळाली आहे. मॅग्झिनने तिला यावेळी कमाईत दहाव्या क्रमांकावर ठेवले आहे. जाणून घ्या युट्यूबच्या माध्यमातून कमाई करणाऱ्या जगभरातील टॉप-१० सेलिब्रिटीमध्ये कोण कोण आहेत.

 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या लिस्टमध्ये भारतीय सेलिब्रिटींचा नंबर लागतो की नाही....

बातम्या आणखी आहेत...