Home | Business | Gadget | this smartphones supports wireless charging

असे काम करते वायरलेस चार्जर, हे स्‍मार्टफोन्‍स करतात सपोर्ट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 26, 2018, 03:02 PM IST

आयफोन 8, आयफोन 8 प्लस, आयफोन एक्स, सॅमसंग गॅलॅक्सी एस-8, गॅलॅक्सी एस-7 आणि नोट 8 या स्मार्टफोनमध्ये वायरलेस चार्जिंगची स

  • this smartphones supports wireless charging

    नवी दिल्ली -आयफोन 8, आयफोन 8 प्लस, आयफोन एक्स, सॅमसंग गॅलॅक्सी एस-8, गॅलॅक्सी एस-7 आणि नोट 8 या स्मार्टफोनमध्ये वायरलेस चार्जिंगची सुविधा देण्यात आली. या कंपन्यांनी वायरलेस चार्जिंगची संकल्पना प्रत्यक्षात आणल्यानंतर अनेकांच्या मनात मोबाईल चार्जिंग कसा होत असेल? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असतील. जाणून घेऊया वायरलेस चार्जरच्या कामाची पद्धत.

    पुढील स्लाईडवर वाचा - वायरलेस चार्जिंगमध्ये हे असते तंत्रज्ञान

  • this smartphones supports wireless charging
    वायरलेस चार्जिंगमध्ये हे असते तंत्रज्ञान
    खरे पाहता वायरलेस चार्जिंग वायरलेस नसते. विशेष म्हणजे स्मार्टफोन, स्मार्टवॉच आणि वायरलेस हेडफोन चार्ज करण्यासाठी कोणत्याही वायरची आवश्यकता नसते. मात्र, वायरलेस चार्जर चालू राहण्यासाठी वॉलशी प्लग करणे गरजेचे असते. ज्यामुळे हे तंत्र चांगल्या पद्धतीने काम करते. 
  • this smartphones supports wireless charging
    - तुम्ही तुमचा फोन वायरलेस चार्जरवर ठेवा.
    - त्यानंतर भिंतीतून येणारी वीज तुमच्या वायरलेस चार्जरमध्ये येऊन मॅग्नेटिक फिल्ड तयार करते. 
    - या मॅग्नेटिक फिल्डचे रुपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होते. याचा वापर मोबाईलमधील बॅटरी चार्ज करण्यासाठी होतो.
    - डिव्हाईसमध्ये वायरलेस चार्जर सपोर्ट करण्यासाठी योग्य हार्डवेअर असण्याची आवश्यकता असते. आवश्यक असलेल्या कॉईलशिवाय डिव्हाईसची चार्जिंग होऊ शकत नाही. 
    ----
    वायरलेस चार्जिंगची सर्वात सोपी पद्धत
    वायरलेस चार्जरची कार्यपद्धती सोडल्यास वायरलेस चार्जिंगचा वापर करणे अत्यंत सोपे आहे. तुमच्या मोबाईलमध्ये या चार्जिंगसाठी हार्डवेअर उपलब्ध असल्यास तुम्ही सपोर्टिंग अॅडाप्टर खरेदी करून वायरलेस चार्जिंगचा आनंद घेऊ शकता. 
    ----
    या स्मार्टफोनमध्ये आहे वायरलेस चार्जिंग सुविधा
    - आयफोन 8, आयफोन 8 प्लस, आयफोन एक्स
    - सॅमसंग गॅलॅक्सी नोट 8 आणि नोट 5
    - सॅमसंग गॅलॅक्सी S8, S8+, S8 Active, S7, S7 Edge, S7 Active
    - एलजी G6 (US and Canada versions only) आणि एलजी V30
    - मोटोरोला मोटो Z, मोटो Z Play, मोटो Z2 Force, मोटो Z2 Play 
     
  • this smartphones supports wireless charging
    या स्मार्टफोनमध्ये आहे वायरलेस चार्जिंग सुविधा
     
    - आयफोन 8, आयफोन 8 प्लस, आयफोन एक्स
    - सॅमसंग गॅलॅक्सी नोट 8 आणि नोट 5
    - सॅमसंग गॅलॅक्सी S8, S8+, S8 Active, S7, S7 Edge, S7 Active
    - एलजी G6 (US and Canada versions only) आणि एलजी V30
    - मोटोरोला मोटो Z, मोटो Z Play, मोटो Z2 Force, मोटो Z2 Play 

Trending