Home | Business | Gadget | Us Company Light Build A Smartphone With 9 Cameras

Dual Cam फोन झाले जुने, आता ही कंपनी आणणार 9 रिअर कॅमेऱ्यांचा स्मार्टफोन

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 06, 2018, 12:07 AM IST

लाइट कंपनी लवकरच बाजारात तब्बल 9-9 रिअर कॅमेरे असलेला स्मार्टफोन लाँच करणार आहे.

 • Us Company Light Build A Smartphone With 9 Cameras

  गॅजेट डेस्क - बाजारात सध्या डुअल कॅम आणि फोर कॅम असलेल्या स्मार्टफोन्सने धूम ठोकली आहे. परंतु, स्मार्टफोन फोटोग्राफीचे हे आधुनिक फीचर सुद्धा लवकरच कालबाह्य होणार आहे. या कॅमेरा तंत्रज्ञानाला अमेरिकेच्या लाइट (Light) स्मार्टफोन कंपनीने टक्कर देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे, लाइट कंपनी लवकरच बाजारात तब्बल 9-9 रिअर कॅमेरे असलेला स्मार्टफोन लाँच करणार आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या एका वृत्तानुसार, स्मार्टफोनच्या रिअर पॅनलवर एक-दोन नव्हे, तर तब्बल 9 कॅमेरा लेन्स लावले जाणार आहे. यातून तब्बल 64 मेगापिक्सल क्वालिटीचे फोटो कॅप्चर करता येतील. हे स्मार्टफोन बाजारात कधी येणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.


  सर्कुलमध्ये राहतील 9 कॅमेरे
  लाइट कंपनीने आपल्या 9 कॅमेऱ्यांच्या स्मार्टफोनचा एक प्रोटोटाइप जारी केला. त्यामध्ये मागच्या बाजूला सर्कुलर अँगलमध्ये 9 कॅमेरे लावलेले दिसून येतात. प्रोटोटाइपमध्ये 8 कॅमरा लेन्स सर्कलचा आकार बनवतात. तर त्यांच्या मध्यभागी एक मुख्य कॅमेरा आहे. सोबतच एलईडी फ्लॅश सुद्धा दिसून येत आहेत.


  16 कॅमेऱ्यांचा डिव्हाइस यापूर्वीच लाँच
  याच कंपनीने गतवर्षी 16 कॅमेरा लेन्स असलेला स्मार्टफोन सुद्धा लाँच केला आहे. यांच्या मदतीने 54 मेगापिक्सल क्वालिटीचा फोटो टिपणे शक्य आहे. त्याला कंपनीने Light L16 या नावाने बाजारात उतरवले होते. त्याची किंमत तब्बल 1,950 अमेरिकन डॉलर अर्थात जवळपास 1.34 लाख रुपये इतकी आहे.


  आतापर्यंत फक्त 3 रिअर कॅमेऱ्यांचे फोन
  - चिनी कंपनी Huawei ने याचवर्षी ट्रिपल रिअर कॅमेरा असलेला जगातील पहिला स्मार्टफोन लाँच केला. P20 Pro असे त्या फोनचे नाव असून ते एप्रिलमध्ये जगभरात विक्रीसाठी उपलब्ध झाले. भारतात या डिव्हाइसची किंमत 64 हजार 999 रुपये इतकी आहे.
  - या फोनमध्ये पहिला कॅमेरा 40 मेगापिक्सल, दुसरा कॅमेरा 20 मेगापिक्सल आणि तिसरा कॅमेरा 8 मेगापिक्सल इतका आहे. सोबतच, सेल्फीसाठी कंपनीने 24 मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे.
  - सध्या सॅमसंगचे स्मार्टफोन Galaxy S10 सुद्धा चर्चेत आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे, की सॅमसंग हा स्मार्टफोन ट्रिपल रिअर कॅमेऱ्यांसह लाँच केला जाणार आहे.

Trending