आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Jio ग्राहकांनो सावधान, फ्री Apps मिळणे होईल बंद, हे रिचार्ज करावे लागेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ३१ मार्चनंतर जिओची फ्री सर्व्हिस बंद होणार आहे. या दिवशी जियोचे प्राइम सबस्क्रिप्शन बंद होणार असल्याने ही सर्व्हिस बंद होणार आहे. रिलायन्सचे मालक मुकेश अंबानी यांनी २१ फेब्रुवारी २०१७ रोजी प्राईम सबस्क्रिप्शन लॉंच केले होते. याची अखेरची तारिख ३१ मार्च होती. ही तारिख नंतर वाढवून १५ एप्रिल करण्यात आली. या प्लॅनची व्हॅलिडिटी १ वर्षे होती. तुम्ही १४ एप्रिल रोजी प्लॅन घेतला असेल तर तो ३१ मार्च रोजी एक्सपायर झाला.

 

जिओ प्राईम मेम्बरशिप ९९ रुपयांना मिळते. त्या अंतर्गत JioTV, JioMusic, JioCinema सारखे १०,००० रुपयांची अॅप्स फ्री देण्यात आले होते. यासह युजर्सना जिओचे बेस्ट प्लॅन देण्यात येत होते. आता मेम्बरशिप एक्सपायर झाल्याने युजर्सना काय करावे लागेल हे कंपनीने सांगितले नाही. युजर्सना पुन्हा मेम्बरशिप प्लॅन घ्यावे लागतील असे सांगितले जात आहे. तसेच याची रक्कम वाढवली जाऊ शकते, असेही सांगितले जात आहे.

 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, जिओ प्राईम मेम्बरशिपची काय आहे अट....

बातम्या आणखी आहेत...