आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Look Inside Samsung Galaxy Factory At South Korea

SAMSUNG मध्ये कॉलेज कॅम्पससारखे वातावरण, सर्वाधिक फीमेल वर्कर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Samsung आज (13 ऑगस्ट) आपले तीन नवे फ्लॅगशिप स्मार्टफोन्स लॉन्च करत आहे. कंपनीच्या वेबसाइटवर पोस्ट झालेल्या प्री-लॉन्च टीजरनुसार, Samsung Galaxy Note 5, Galaxy S6 Edge+ आणि एक टॅबलेट लॉन्च होणार आहे. भारतीय वेळेनुसार हे सर्व गॅजेट्‍स रात्री 8.30 वाजता सादर करण्‍यात येणार आहे.

आघाडीची इलेक्ट्रॉनिक कंपनी Samsung ने सुरुवातीला भाजी, नुडल्स आणि मासे विकले होते, हे तुम्हाला माहीत आहे का? Samsung आज जगातील अव्वल स्मार्टफोन मेकर कंपनी बनली आहे.
या पॅकेजमधून आम्ही आपल्याला दक्षिण कोरियातील गुमी येथील Samsung मोबाइल डिव्हाइस फॅक्टरीविषयी माहिती देत आहोत. कंपनी आपल्या ग्राहकांप्रमाणे कर्मचार्‍यांकडे देखील विशेष लक्ष देते.

* कॉलेज कॅम्पससारखे वातावरण-
फॅक्टरी हा शब्द ऐकताच, तेथे सर्व कर्मचारी काम करत असतील. त्यांचे हात-कपडे मळलेले असतील. चौफेर सामान अस्ताव्यस्त पडलेला असेल, अशी कल्पना आपण करू लागतो. परंतु, Samsung मोबाइल फॅक्टरीमध्ये असे काहीच पाहायला मिळत नाही. फॅक्टरीतील वातावरण नेहमी प्रसन्न असते. फॅक्टरीत गेल्यानंतर कॉलेज कॅम्पसमध्ये गेल्याचा आपल्याला भास होतो. फॅक्टरीतील स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले जाते.
* फॅक्टरीत सर्वाधिक फीमेल वर्कर्स-
बिझनेस इंसाइडरच्या एका रिपोर्टनुसार, सॅमसंग फॅक्टरीत 20 ते 30 वर्षे वयोगटातील महिलांची संख्या सर्वाधिक आहेत. काही महिलांनी टीनएजमध्ये रोजगार मिळवला आहे.

* वर्कर्ससाठी नाइट कॉलेज कोर्सची सुविधा...
घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे शिक्षण अर्ध्यात सोडून रोजगार स्विकारावा लागलेल्या वर्कर्सची संख्या जास्त आहे. अशा वर्कर्ससाठी सॅमसंगने नाइट कॉलेज कोर्सची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. इतकचे नव्हे तर वर्करने कोर्स पूर्ण केल्यानंतर त्याला उच्चपदावर प्रमोशन देखील दिले जाते.
पुढील स्लाइडवर पाहा, गुमी येथील Samsung मोबाइल डिव्हाइस फॅक्टरीचे फोटो...