आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यभरातील सर्व स्वस्त धान्य दुकानांत हाेणार कॅशलेस खरेदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राेखरहित व्यवहारांना गती देण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली अाहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील रेशन दुकानेदेखील लवकरच कॅशलेस हाेणार अाहेत. अाता यापुढे रेशन दुकानातून शिधा वस्तूंच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी मोबाइल किंवा ई-वाॅलेटचा वापर वाढवण्यावर भर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला अाहे.

राज्यात एकूण १ काेटी ४८ लाख पात्र शिधापत्रिका अाहेत. या सर्व शिधापत्रिकाधारकांना राज्यातल्या ५१ हजार ३६३ रेशन दुकानांमधून शिधा वस्तूंचे वाटप करण्यात येते. सध्या रेशन दुकानांत अन्नधान्याच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार राेखीनेच हाेतात. परंतु यापुढे मोबाइल अाणि ई-वाॅलेटद्वारे व्यवहार करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने शासन निर्णयात म्हटले अाहे

शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा संचालक, मुंबई, जिल्हा पुरवठा, अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना रास्त भाव दुकानदारांकडून इलेक्ट्राॅिनक पद्धतीने िशधा वस्तूंची रक्कम स्वीकारण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेशही राज्य सरकारने दिले अाहे. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने शिधा वस्तूंची रक्कम स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध असल्याचा फलक लावण्याबराेबरच रेशन दुकानांना या प्रणालीची माहिती हाेण्यासाठी तालुकानिहाय प्रशिक्षण शिबिर अायाेजित करणे तसेच त्याबाबतची प्रात्यक्षिके दाखवण्याच्या सूचनाही देण्यात अाल्या अाहेत. रेशन दुकानांमधील िशधा वस्तूंची विक्री पाॅइंट अाॅफ सेलच्या माध्यमातून करण्याची तयारी प्रगतिपथावर असून ही सुविधा राज्यातल्या सर्व रास्त भाव दुकानात उपलब्ध करून देण्यात येणार अाहे. त्यामुळे रेशन दुकानदार अाणि िशधापत्रिकाधारकांनी अाधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करण्याची कार्यवाही पूर्ण करावी, अशी सूचनाही शासन िनर्णयात देण्यात अाली अाहे.

मोबाइल
नॅशनल पेमेंट काॅर्पोरेशन अाॅफ इंडियाशी संलग्न बँकेत ग्राहक व रेशन दुकानदार यांचे बँक खाते असणे गरजेचे अाहे. जनधन तसेच बचत खात्याचा वापर यासाठी करता येऊ शकेल. सर्व ५१ प्रमुख राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँकांतून हे व्यवहार करता येतील.

मोबाइलवरून * 99# हा क्रमांक डायल करा.. अापल्या बँकेच्या शाॅर्टनेममधील पहिली तीन अक्षरे किंवा अायएफएससी काेडमधील पहिली चार अक्षरे नमूद करा.. फंड ट्रान्सफर- एमएमअायडी हा पर्याय निवडा. ज्याला रक्कम अदा करायची अाहे त्याचा मोबाइल क्रमांक अाणि एमएमअायडी नमूद करा. रक्कम व एम- पिन नमूद करा.. मोबाइलवर स्पेस देऊन बँक खाते क्रमांकाचे शेवटचे चार अंक नमूद करा.

ई-वाॅलेट
रेशन दुकानदार अाणि लाभार्थी या दोघांकडेही एकाच कंपनीचे ई-वाॅलेट असणे गरजेचे. रेशन दुकानदार व िशधापत्रिकाधारक यांच्याकडे मोबाइल फाेन मोबाइल क्रमांकासह असणे बंधनकारक.

अापल्या मोबाइलमध्ये पेमेंट बंॅक किंवा अन्य कंपन्यांचे ई-वाॅलेट डाऊनलोड करा.. मोबाइल क्रमांक नमूद करून नाेंदणी करावी. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग हे ई-वाॅलेटशी जाेडा

शिधापत्रिकाधारकांनी या गाेष्टी कराव्यात
मोबाइल मनी अायडेंिटफिकेशन क्रमांक , मोबाइल पिन (एम पिन), मोबाइल क्रमांक, बँकेचा अायएफएससी काेड, बँक खाते क्रमांक किंवा अाधार क्रमांकाशी संलग्न बँक खाते क्रमांक असावा. रेशन दुकानदार, शिधापत्रिकाधारकांकडे कार्यरत असलेल्या क्रमांकासह मोबाइल फाेन असणे गरजेचे आहे. मोबाइल बँकिंगसाठी मोबाइल क्रमांकाची नाेंदणी बँकेकडे करणे अावश्यक आहे.
बातम्या आणखी आहेत...