आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंद होणार होते Android, वाचा, कोण आहे जन्मदाता आणि OSची रंजक माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अँड्रॉइड ऑपरेटींग सिस्टम (OS)ही जगातील सर्वात जास्त वापरली जाणारी ऑपरेटींग सिस्टम आहे. OSच्या फीचर्स इतकेच त्यांचे नावे आकर्षक आहेत. माणसाप्रमाणे दिसणारे आणि काम करणारे रोबोट असा 'अँड्रॉइड' या शब्दाचा अर्थ आहे. उल्लेखनिय म्हणजे अॅड्राइड ऑपरेटींग सिस्टमची नावे ही चॉकलेट आणि मिठाईच्या नावावरूनच ठेवली जातात.
बंद होणार होती अँड्रॉइड
जगातील सर्वात लोकप्रिय मोबाइल ऑपरेटींग सिस्टम बनवणारी कंपनी 'अँड्रॉइड इंक' बंद होणार होती. सुरूवातीच्या काळात ही कंपनी प्रचंड आर्थिक तंगीतून जात होती. 2003मध्ये सुरू झालेली 'अँड्रॉइड इंक'ला कंपनीचा खर्च उचलणे अशक्य झाले होते. 2005 मध्ये या कंपनीला गुगलने खरेदी केले. यानंतर अँड्रॉइडमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आणि आता ही जगातील सर्वात लोकप्रिय मोबाइल ऑपरेटींग सिस्टम बनली आहे. या पॅकेजमधून आम्ही आपल्या वाचकांसाठी अँड्राइड ऑपरेटींग सिस्टमची रंजक माहिती घेऊन आलो आहोत.

अँड्रॉइड ओएसची नावे चॉकलेट आणि मिठाईच्या नावावर ठेवली जातात....
अँड्रॉइड ओएसची नावे चॉकलेट आणि मिठाईच्या नावावर ठेवली जातात. मात्र, यामागे कोणते कारण आहे, याविषयी गुगलने कोणताही खुलासे केलेला नाही. टीमला जोडून ठेवण्यासाठी प्रत्येक अँड्राइड ओएसचे नाव मिठाईवरून ठेवले जात असल्याचे गुगलचे प्रवक्ता रॅन्डाल सराफा यांनी सांगितले आहे.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, कोण आहे 'अँड्रॉइड'चा जन्मदाता?
बातम्या आणखी आहेत...