आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Apple Co Founder Steve Wozniak Has Sold Los Gatos House

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

असा दिसतो Apple च्या को-फाउंडरचा आलिशान बंगला, किंमत कोटयवधींच्या घरात!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Apple कंपनीचे आज दोन स्मार्टफोन (iPhone) लॉन्च होणार आहेत. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आयोजित करण्‍यात आलेल्या इव्हेंटमध्ये हे फोन सादर करण्‍यात येणार आहे.

Apple कंपनीचे CEO टिम कुक हे जगातील यशस्वी CEO पैकी एक आहे. स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वॉजनियाक या दोघांनी कंपनीची स्थापना केली होती. मात्र, कंपनीला खर्‍या अर्थाने यशाच्या उंच शिखरावर नेण्यासाठी टिक कुक यांनी प्रचंड परिश्रम घेतले आहे.

स्टीव्ह वॉजनियाक आणि स्टीव्ह जॉब्स या दोघांनी 1976 मध्ये कंपनी सुरु केली होती. स्टीव्ह यांचे नाव त्या काळात हॉलिवुडची अॅक्ट्रेस कॅथी ग्रिफिनसोबत चर्चेत आले होते. कॅलिफोर्नियामधील टाउन लॉस गेटॉसमध्ये स्टीव्ह यांचा एक शानदार बंगला होता. त्याची नुकताच विक्री झाली आहे. या बंगल्याची किंमत 3.9 मिलियन अर्थात जवळपास 24 कोटी 90 लाख 54 हजार रुपये होती.

7,500 स्क्वेयर फूट जमिनीवर असलेल्या बंगला सर्व सुविधांनी परिपूर्ण आहे. आलिशान डाइनिंग हॉल, बेडरूम, किचन, स्विमिंग पूल, बाथरूम, बार आहे. संपूर्ण घराला आतून व्हाइट पेंट देण्यात आला आहे. घरात विविध डिझाइन आणि रंगाच्या स्टाइल बसवल्या आहेत. घराला मोठ-मोठ्या खिडक्या बसवण्यात आल्या असून त्यातून बाहेरचे विभोनिय दृश्य पाहावयास मिळते. विशेष म्हणजे Apple चे ऑफिस बनवणार्‍या कॉन्ट्रॅक्टरनेच हे बंगला उभारला होता. घराचे डिझाइन Apple च्या लोगोप्रमाणेच करण्‍यात आले आहे. घरात शानदार इंटीरियरदेखील करण्‍यात आले आहे. > 6 बेडरूम
> 8 बाथरूम
> प्ले रूम
> स्विमिंग पूल
> व्हाइट इंटीरियर

पुढील स्लाइड्सवर पाहा, Apple च्या को-फाउंडरच्या आलिशान बंगल्याचे फोटो...