आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Apple Founder Steve Wozniak Has Sold For $3.9million In Los Gatos

B\'Day: असे होते Appleचे को-फाउंडर स्टीव्ह यांचे घर, कोट्यवधीत विकले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील प्रसिद्ध इन्व्हेंटर स्टीव्ह व्हॉजनियाक यांचा आज 65 वा वाढदिवस. सॅन जोस, कॅलिफोर्नियामध्ये 11 ऑगस्ट, 1950 रोजी स्टीव्ह यांचा जन्म झाला होता. जगातील सगळ्यात मोठी टेक कंपनी Appleचे ते को-फाउंडर आहेत. इलेक्ट्रॉनिक इंजीनियर आणि कॉम्प्युटर प्रोग्रामर म्हणूनही स्टीव्ह परिचित आहेत.

स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह व्हॉजनियाक यांनी 1976 मध्ये Apple कंपनी सुरु केली होती. हॉलीवुड अॅक्ट्रेस कॅथी ग्रिफिनसोबत नाव जोडल्यामुळेही स्टीव्ह चर्चेत आले होते.
कॅलिफोर्नियातील लॉस गेटॉस शहरात स्टीव्ह व्हॉजनियाक यांचे एक टूमदार घर होते. परंतु ते नुकतेच विकले गेले. या घराची किंमत 3.9 मिलियन अर्थात 24 कोटी 90 लाख 54 हजार रुपये घराची किंमत होती. Appleचे ऑफिस बनवलेल्या कॉन्ट्रॅक्टरनेच घराची निर्मिती केली होती. घराचे डिझाइन Apple लोगो प्रमाणेच आहे.
7,500 स्क्वेअर फूट जागेत उभारण्यात आलेल्या या घरात प्रत्येक गोष्ट आहे. आलीशान डायनिंग हॉल, बेडरूम, किचन, स्विमिंग पूल, बाथरूम, बार शानदार पद्धतीने सजवण्यात आले आहे. संपूर्ण घरात व्हाइट पेंट लावण्यात आला असून छताजवळ डोंगर रेखाटण्‍यात आले आहे. घराच्या भिंतींवर वेग-वेगळी डिझाइन आणि कलर फर्श करण्‍यात आले आहे. घराला मोठ्या खिडक्या असून त्यातून बाहेरील मनमोहक दृश्य दिसते.

> सहा बेडरूम
> आठ बाथरूम
> प्ले रूम
> स्विमिंग पूव
पुढील स्लाइडवर पाहा, स्टीव्ह व्हॉजनियाकचे कॅलिफोनियातील घराचे फोटो...