आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Apple ने लॉन्च केला वाटरप्रूफ आयफोन 7, 7 प्लस आणि वॉच, 9 सप्टेंबरपासून प्री बुकिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅपल लाँचनंतर कंपनीचे सीईओ टीम कुक सिंगर सियाला मोबाइल दाखवताना. - Divya Marathi
अॅपल लाँचनंतर कंपनीचे सीईओ टीम कुक सिंगर सियाला मोबाइल दाखवताना.
Apple ने आपला बहुप्रतिक्षीत सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन आयफोन 7 (iphone 7) आणि आयफोन 7 प्लस (iphone 7 plus) लॉन्च केला आहे. 7th जनेरेशनसाठी विना ऑडिओ जॅक असलेला लेटेस्ट आयफोनसोबत अॅपलने ऑपरेटिंग सिस्टिम iOS 10, अॅल वॉच सीरीज 2 आणि एअरपॉड्स इयर बड्ससोबत एकूण 5 गेम चेंजर प्रॉडक्ट्स बाजारात उतरवले आहे.

या लाँचिंगकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले होते. पण, सर्वाधिक उत्सुकता आयफोन 7 ची होती. उल्लेखनिय म्हणजे अॅपल वॉचमध्ये यूजरला पोकेमॅन गो गेम खेळण्याचाही आनंद लुटता येणार आहे. या खास इव्हेंटमध्ये अॅपलसाठी बनवण्यात आलेला सुपर मारियो रन गेम देखील लॉन्च करण्‍यात आला आहे.

आयफोन 7 ची प्री- ऑर्डर बुकिंग 9 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. ऑर्डर केलेल्या ग्राहकांना आयफोन ऑक्टोबरपर्यंत डिलिव्हर होईल. भारतातीय बाजारात आयफोन 7 ऑक्टोबरमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, हे आहेत अॅपलचे न्यू गॅजेट्स आणि त्यांच्या किमती...
बातम्या आणखी आहेत...