नवी दिल्ली- भारतीय बाजारात अॅपल आयफोन 7 आणि 7 प्लस शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता लॉन्च झाला. या बहुप्रतिक्षीत आणि 7th जनेरेशनसाठी विना ऑडिओ जॅक असलेला लेटेस्ट आयफोनसोबत ऑपरेटिंग सिस्टिम iOS 10, अॅल वॉच सीरीज 2 आणि एअरपॉड्स इयर बड्ससोबत एकूण 5 गेम चेंजर प्रॉडक्ट्स बाजारात उतरवले आहेत.
या लाँचिंगकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले होते. पण, सर्वाधिक उत्सुकता आयफोन 7 ची होती. उल्लेखनिय म्हणजे अॅपल वॉचमध्ये यूजरला पोकेमॅन गो गेम खेळण्याचाही आनंद लुटता येणार आहे. या खास इव्हेंटमध्ये अॅपलसाठी बनवण्यात आलेला सुपर मारियो रन गेम देखील लॉन्च करण्यात आला आहे.
आयफोन 7 ची प्री- ऑर्डर बुकिंग 9 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. ऑर्डर केलेल्या ग्राहकांना आयफोन ऑक्टोबरपर्यंत डिलिव्हर होईल. भारतातीय बाजारात आयफोन 7 ऑक्टोबरमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, अॅपलच्या न्यू गॅजेट्सचे स्पेसिफिकेशन्स आणि किमती...