Apple ने बुधवारी
आपले बहुचर्चित iPhone 6S आणि 6S plus लॉन्च केले. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये कंपनीचा मेगा इव्हेंट झाला. त्यात कंपनीने आलेले विविध गॅजेट्सही लॉन्च केले आहेत. Apple ने आपली वॉच, पेन्सिल व ipad Pro लॉन्च केला आहे.
iPad-Pro व Apple TV वरच जास्त फोकस
काही वर्षांपासून कंपनीच्या लॉन्चिंग प्रोग्राममध्ये iPhone चाच जास्त बोलबाला असायचा. मात्र, या इव्हेंटमध्ये कंपनीने iPad- Pro व Apple TV वर जास्त फोकस करण्यात आला. दोन्ही डिव्हाइस खास पद्धतीने सादर करण्यात आले.
iPhone 6S व 6S Plus आधीच्या व्हर्जनच्या तुलनेत शानदार आहेत तर Apple TV ला मागील तीन वर्षांत पहिल्याला अपडेट करण्यात आले आहे. या टीव्हीच्या माध्यमातून स्ट्रीमिंग टीव्ही बॉक्सच्या मार्केटमध्ये आपला दबदबा निर्माण करण्याचा कंपनीचा इदारा आहे. या मार्केटमध्ये आधीच गूगल, अमेझन सारख्या कंपन्यांनी आपल्या जम बसवला आहे. मात्र, आतापर्यंतचा सर्वात मोठ्या साइजमधील iPad -Pro कंपनीच्या टॅबलेट बिझनेस नवसंजीवनी देईल, अशी अपेक्षा आहे. मागील काही महिन्यांपासून कंपनीच्या iPad च्या विक्रीत कमालीची घट दिसून आली आहे. यामुळेच कंपनी यावेळी इनोव्हेशनच्या बाबतीत दोन प्रॉडक्ट्सवरच जास्त फोकस केलेला दिसत आहे.
iPhone 6S व 6S Plus यंदा एकूण 130 देशांमध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. भारतात हा फोन कधी उपलब्ध होईल, त्यांच्या किमती काय असतील, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
iPhone 6S चा डिस्प्ले 4.7 इंचाचा आहे. तर 6S Plus चा डिस्प्ले 5.5 इंचाचा आहे. कंपनीने आतापर्यंत लॉन्च केलेल्या फोनमध्ये हे फोन जास्त फास्ट आहे. 6S व 6S Plue सिल्व्हर, गोल्ड, स्पेस ग्रे आणि रोज गोल्ड कलरमध्ये उपलब्ध करून देण्यात येतील. दोन्ही फोनमध्ये अत्याधुनिक 'टच' टेक्नॉलॉजीसह शानदार फीचर्स देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे दोन्ही हँडसेट 3D टच टेक्नॉलॉजीने अद्ययावत आहेत.
US यूजर्ससाठी दोन्ही व्हेरिएंटची किंमत दोन वर्षांच्या कॉन्ट्रॅक्टवर खालीलप्रमाणे राहातील...
iPhone 6S |
किंमत |
16GB |
199 डॉलर (जवळपास 13,244 रुपये) |
64GB |
299 डॉलर (जवळपास 19,899 रुपये) |
128GB |
399 डॉलर (जवळपास 26,555 रुपये) |
iPhone 6S Plus |
किंतम |
16GB |
299 डॉलर (जवळपास 19,899 रुपये) |
64GB |
399 डॉलर (जवळपास 26,555 रुपये) |
128GB |
499 डॉलर (जवळपास 33,210 रुपये) |
पुढील स्लाइडवर पाहा, सॅन फ्रान्सिस्कोमधील मेगा इव्हेंटमध्ये Apple ने सादर केलेले डिव्हाइसेस...