आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Apple May Launch Cheaper Variant Of IPhone On 9th September

9 सप्टेंबरला लॉन्च होईल Appleचा स्वस्त iPhone व नेक्स्ट जनरेशन टीव्ही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Apple कंपनी लवकरच आपला स्वस्त iphone 6c बाजारात उतरवण्याची शक्यता आहे. Apple ने येत्या 9 सप्टेंबरला एक इव्हेट आयोजित केला आहे. इव्हेंटमध्ये Apple आपला Next Generation TV, iphone 6 चे स्वस्त व्हेरिएंट्स आणि ipad लॉन्च करणार असल्याचे एका मीडिया रिपोर्ट्‍समध्ये म्हटले आहे.

लीकस्टरनुसार (@evleaks) Apple iphone 5C चे नवे व्हेरिएंट iphone 6C लॉन्च होणार आहे. हे डिव्हाइस मेटल बॉडीसोबत येईल. मात्र, कंपनीने याविषयी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. Apple iphone 6S, 6S + आणि 6C लॉन्च होण्याच्या तयारीत असल्याचे इवान ब्लासने (@evleaks) आपल्या 'ट्वीट'मध्ये म्हटले आहे.

Appleच्या स्वस्त iphone 6cचे फीचर्स-
इंटरनेटवर लीक झालेल्या माहितीनुसार, iphone 6C (स्वस्त व्हेरिएंट) मध्ये पॉवरफूर बॅटरी असेल. (1715 mAh). याआधी लॉन्च झालेल्या iphone 5Cमध्ये 1500 mAh बॅटरी होती. याशिवाय फोनचा डिस्प्ले स्क्रीन 4 इंचाचा असेल.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, iphone 6S आणि 6S+ विषयी लॉन्च झालेली माहिती...
(टीप: बातमीसोबत जोडलेली सर्व फोटो इंटरनेटवर लीक झाली आहेत. Apple ने आतापर्यंत iphone 6cचा कोणताही अधिकृत फोटो जाहीर केलेला नाही.)