आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅपलच्या व्यासपीठावर महिलांचे प्रेझेंटेशन, ३९ वर्षांत केवळ ६ वेळाच स्टेजवर दर्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅन फ्रान्सिस्को - दिग्गज कंपन्यांच्या सीईओंची महिला प्रतिनिधित्वावरील प्रश्नांवर फेफे उडते. मात्र, अॅपलचे सीईओ टिम कुक यांच्यासाेबत असे झाले तेव्हा त्यांनी संधीचा फायदाच घेतला. अॅपलच्या डेव्हलपर्स काॅन्फरन्सच्या पूर्वसंध्येला पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की, तुमच्या कार्यक्रमात व्यासपीठावर महिला प्रेझेंटेशन देताना का दिसत नाहीत? त्यावर कुक उत्तरले, उद्या मोठा बदल घडलेला दिसेल व हेच कंपनीचे भविष्य आहे. काॅन्फरन्स सोमवारी रात्री उशिरा सुरू झाली. यात प्रथमच दोन महिलांनी व्यासपीठाचा ताबा घेतला. आधी इंटरनेट सर्व्हिसेसच्या उपाध्यक्ष जेनिफर बॅले व पाठोपाठ प्रॉडक्ट मार्केटिंगच्या उपाध्यक्ष सुसान प्रेसकॉट आल्या. दोघीही १० वर्षांपासून कंपनीत काम करत आहेत. कंपनीच्या ३९ वर्षांच्या इतिहासात महिलांना स्टेजवर येण्याची संधी केवळ सहा वेळा मिळालेली आहे. मात्र, डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये एकदाही महिलांनी प्रेझेंटेशन दिलेले नाही. अॅपलमध्ये ३० टक्के महिला कर्मचारी आहेत.

फ्लिपबोर्ड न्यूज अॅप सुसान यांनी लाँच केले. ते आपल्या वाचण्याच्या सवयीचे विश्लेषण करून आवडीच्या बातम्या
देईल. जेनिफरने अॅपल पे सर्व्हिसची माहिती दिली.

आयओएक्स ९ लाँच
{आयफोन वापराच्या पद्धतीचे विश्लेषण करून काम करेल.
{उदा. रात्री गाणी ऐकण्याची सवय असेल तर हेडफोन लावताच गाणी सुरू.
{बॅटरी बॅकअप तीन तासांनी वाढवेल.
मॅकबुकसाठी नवी ओएस लाँच
ओएक्स ईआय कॅपिटन लाँच झाली. यात आयफोनसारखे फीचर्स आहेत. फाइलचे नाव नसल्यास ती सहजपणे शोधता येईल. उदा. "डॉक्युमेंट, ज्यावर जूनमध्ये काम केले आहे' असे लिहिताच जूनमधील सर्व फायली दिसतील. पीडीएफ फाइल आधीपेक्षा चारपट वेगाने उघडेल.
म्युझिक स्ट्रीमिंग सर्व्हिस : अाजवर आयट्यूनमधून गाणी विकत घ्यावी लागायची. अाता करार झालेल्या कंपन्यांसोबत त्यांची गाणी अॅपल म्युझिकवर ९०० रुपये दरमहा शुल्क भरून ऐकता येतील. गाना, हंगामासारखे अॅप म्युझिक स्ट्रीमिंग सेवा देत असतात.