Apple कंपनीने बुधवारी (दि. 9) आयफोनसह एकुण पाच प्रॉडक्टस् लॉन्च केले आहेत. यामध्ये सर्वात लक्षवेधक प्रॉडक्ट टीव्ही आहे. Apple चा टीव्ही म्हणजे एक डिजिटल मिडीया प्लेयरचा सेट टॉप बॉक्स आहे. टीव्ही आकाराने लहान आहे. परंतु इंटरनेट कनेक्शन असल्यामुळे स्क्रीनवर स्ट्रिम करू शकते. यावर लाइव्ह टीव्ही चॅनेल, चित्रपट, नेटफ्लिक्स, HBO चित्रपटासह ऑनलाइन टीव्ही शो आणि व्हिडिओ पाहता येते. टीव्हीची क्वॉलिटी आणि स्ट्रिम उत्कृष्ट दर्जाची आहे.
Apple टीव्हीची वैशिष्टये-
* Apple टीव्ही अॅपद्वारे चालते
* टच सरफेस रिमोट कंट्रोल
* रिमोटवर ग्लास टच सरफेसने यूजरर्सला म्यूट, डिस्प्ले, सिरी, प्ले/पॉज, वॉल्यूम बटनांचा वापर करता येतो.
* Apple चे इतर डिव्हाइस आयफोन, आयपॅड तसेच पेन्सिलनेही टीव्ही ऑपरेट करता येते.
* XBOX One आणि PS 4 सारखी टीव्ही काम करते.
* टीव्हीच्या मदतीने ऑनलाइन शॉपिंग करता येते.
* किंमत आणि उपलब्धता-
* Appleची टीव्ही ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत उपलब्ध होणार आहे.
यात 32 आणि 65GB मेमरी आहे.
* 32GB टीव्हीची किंमत 149 डॉलर (9,916 रुपये) आणि 65GB ची किंमत 199 डॉलर(13,244 रूपये) आहे.
Apple टीव्हीची विषेश वैशिष्टये-
Apple टीव्हीची विषेश वैशिष्टय म्हणजे ते सीरी आहे. यात रिमोट कंट्रोल एक मायक्रोफोन सारखा येतो. दोन इंटिग्रेटेड मायक्रोफोन आहे- एक व्हॉइस कमांड घेण्यासाठी तर दूसरा बॅकग्राउंड आवाज (नॉइज) फिल्टर करण्यासाठी.
पुढील स्लाइडवर वाचा इतर Apple टीव्हीची वैशिष्टये...