आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Apple Unveils IOS 9, Apple Music, Watch OS And Many More At WWDC 2015

Apple ने लॉन्च केले 4 न्यू प्रॉडक्ट्स, यूजर्सला मिळतील हे हायटेक Gadgets

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Appleचे 'वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्स 2015'ला (WWDC) सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आज, 9 जूनला मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला. पाच दिवस हा इव्हेंट चालेल. सुरवातीलाच Apple Music, iOS 9, Apple watch साठी न्यू OS आणि अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

Apple आता जगातील सगळ्यात मोठी स्मार्टफोन कंपनी बनली आहे. Apple कंपनी आणि यूजर्ससाठी हा इव्हेंट खास ठरणार आहे. WWDCच्या माध्यमातून गॅजेटवर्ल्डमध्ये मोठे परिवर्तन दिसून येणार असल्याचा दावा, Appleचे चीफ एक्झिक्युटव्ह ऑफिसर टिम कुक यांनी केला आहे.
WWDCला सोमवारी मध्यरात्री प्रारंभ झाला. पहिल्यांदा असे घडले की, दोन महिलांनी व्यासपीठाचा ताबा घेतला. आधी इंटरनेट सर्व्हिसेजची व्हाइस प्रेसिडेंट जेनिफर बेले व्यासपीठावर आल्या. त्यांच्या पाठोपाठ प्रॉडक्ट मार्केटिंगच्या व्हाइस प्रेसिडेंट सुसेन प्रेसकॉट पोहोचल्या. दोन्ही महिला अधिकारी गेल्या 10 वर्षांपासून कंपनीत कार्यरत आहेत. 39 वर्षांच्या कंपनीच्या इतिहासात फक्त सहा असे झाले आहे की, महिला अधिकारी व्यासपीठावर आल्या.

Big Announcement
- Apple ने iOS 9 लॉन्च केले.
- म्युझिक स्ट्रीमिंग सर्व्हिस 'Apple Music'लॉन्च.
- Watch OS 2 लॉन्च (Apple watchसाठी शानदार Apps)
- OS X EI Capitan (Macसाठी न्यू ऑपरेटिंग सिस्टम)

1. iOS 9
WWDC च्या पहिल्या दिवशीच Appleचे चीफ एक्झिक्युटीव्ह ऑफिसर टिम कुक यांनी iOS 9 लॉन्च केले. iOS 8 ला अपग्रेड करून Apple ने iOS 9 चे रुप दिले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, इतर घोषणांविषयी...