आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Apple\'s CEO Tim Cook Warns IPhone Sales To Fall For First Time

Appleची जादू संपुष्टात? iPhone च्या विक्रीत घट, आता भारतावर फोकस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अॅपलची क्रेझ दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिसत आहे. त्यात यंदा iPhoneच्या विक्रीत प्रचंड घट होण्याची शक्यता आहे. मागील 10 वर्षात iPhone ची मागणीत कमालीची घट दिसून आली आहे. याबाबत अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टिम कुक यांनी चिंता व्यक्त केली आहे.

अॅनालिस्ट्ससोबतच्या बैठकीत टिम कुक यांनी या मुद्द्यावर चर्चा केली. अॅपलने आता भारतीय बाजारावर फोकस केले आहे. भारताकडून अॅपलच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

विक्रीत किती घट?
- अॅपलने मंगळवारी गत तीन महिन्यांचा लेखाजोखा जाहीर केला.
- डिसेंबर 2015 ला तिसर्‍या तिमाहीत अॅपलने 75.9 अरब डॉलर (5158 अब्ज रुपये) नफा मिळवला. 2014 वर्षाच्या तुलनेत हा नफा केवळ दोन टक्क्यांनी जास्त आहे.
- या तिमाहीत अॅपलने एकूण 18.4 अब्ज डॉलरची कमाई केली. (1250 अब्ज रुपये)
- वर्ष 2007 नंतर अॅपलच्या महसूल व नफ्यात कमालीची घट आली आहे. याचा अर्थ असे की अॅपलचे मार्केट डाउन होण्यास सुरुवात झाली आहे.
- टिम कुक यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
- ऑगस्ट 2015 पासून कंपनीचे शेयर्स 20 ते 25 टक्क्यांनी घसरले आहेत.