आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात लॉन्च झाला जगातील पहिला 4GB रॅम असलेला स्मार्टफोन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीत एका इव्हेंटमध्ये Asus कंपनीने आपला बहुचर्चित 4GB रॅम असलेला स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Asus ZenFone 2 हा जगातील पहिला 4GB रॅम असलेला स्मार्टफोन आहे. इंटेलच्या पॉवरफुल प्रोसेसरने हा फोन अद्ययावत आहे. या फोनमध्ये व्हॉल्युम रॉकर बटन बॅक साइडला दिले आहे.
Asus ZenFone 2 च्या लॉन्चिंगला बॉलीवूडचा छोटे नवाब अर्था सैफ अली खान आणि फेमस फोटोग्राफर डब्बू रत्नानी उपस्थित होता. Flipkart तसेच Asus च्या रिटेल स्टोअर्सवर Asus ZenFone2 हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असेल.
मॉडेलची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स...
* 2GB रॅम आणि 16 GB मेमरी- 12999 रुपये
* 2 GB रॅम आणि 32GB मेमोरी- 14999 रुपये
* 4GB रॅम आणि 32 GB मेमोरी- 19999 रुपये
* 4 GB रॅम आणि 64 GB मेमोरी- 22999 रुपये
इव्हेंटमधील आकर्षण...
* Asus ZenFone लॉन्चिंग इव्हेंटला सिंगर अदिति शर्माच्या गाण्‍याने प्रारंभ झाला.
* Asus कंपनीचे CEO जेरी शेन यांनी ZenFone 2 सादर केला.
* Asus ZenFone 2 हा जगातील पहिला 4GB रॅम असलेला फोन आहे. यापूर्वी CES मध्ये (कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक शो, लॉस वेगास) सादर करण्‍यात आला होता.
* ZenFone 2मध्ये कंपनीनुसार मॅक्सिमम व्हुइंग एक्सपीरियन्स मिळेल. iphone 6+ मध्येही हाच एक्सपीरियन्स मिळतो.
* Asus ZenFone 2 ची इल्युजन सीरीज (नवे बॅककव्हर आणि डिझाइनसोबत) भारतीय बाजारात सादर करण्यात आले आहे.
* इव्हेंटला इंटेलचा दक्षिण आशिया विंगचे सेल्स अॅण्ड मार्केटिंग व्हाइस प्रेसिडेंट देवजानी घोष उपस्थित होते.
* कंपनीनुसार Asus ZenFone 2 मध्ये सर्वात पॉवरफुल CPU देण्यात आला आहे.
* Asus India चे प्रॉडक्ट मॅनेजर डेरिक YU उपस्थित होते.
* Asus ZenFone 2 मध्ये 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

ZenFone 2 चे वैशिष्‍ट्ये....
* फास्ट चार्जिंग कॅपेसिटी- 39 मिनिटांत जवळपास 60 टक्के बॅटरी चार्ज होते.
* 4GB रॅम - Asus ZenFone 2 चे खास वैशिष्ट्ये म्हणजे त्याची 4 GB रॅम. 4GB रॅम असलेला हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, Asus ZenFone 2 चे फीचर्स-