आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या TIPS वाढवू शकतात तुमच्या मोबाईल व लॅपटॉपचा बॅटरी बॅकअप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाजारात एकापेक्षा एक दर्जेदार स्मार्टफोन दाखल होत आहेत. मात्र, बहुतांश मोबाइलमध्ये कमी पॉवरची बॅटरी असते. त्यामुळे ऐनवेळ‍ी बॅटरी डिस्चार्ज झाल्यामुळे युजर्सची मोठी अडचण होत आहे. मात्र, काही ट्रीक वापरल्या, सोबतच सावधगिरी बाळगली घरच्या घरी मोबाइल आणि लॅपटॉपची बॅटरी बॅकअप वाढवता येईल.

या पॅकेजमधून आम्ही आपल्याला काही टीप्स घेऊन आलो आहोत.

तापमानावर लक्ष द्या...
तुमच्या डिव्हाइसच्या बॅटरीवर त्याच्या जवळपासच्या तापमानाचा प्रभाव पडतो. तुम्ही 0 डिग्री सेल्सिअसच्या खाली अथवा 35 डिग्री सेल्सियसच्या वर तापमान असलेल्या ठिकाणी असाल तर तुमची बॅटरी खुपच लवकर संपेल. याशिवाय, खुप उष्‍ण असेल तर त्याचाही प्रभाव बॅटरीवर पडतो. यामुळे डिव्हाइस गरम होतो आणि बॅटरीची क्षमताही कमी होते. यामुळे तुमचा फोन, टॅबलेट सूर्याच्या गर्मीपासून दूर ठेवावा. थंडीच्या तुलनेत गर्मी बॅटरीवर जास्त प्रभाव पाडते.त्याचबरोबर लॅपटॉपवरही असेच परिणाम पाहायला मिळतात. लॅपटॉपचा जेवढा वापर केला जातो तेवढी बॅटरी गरम होते. यामुळे लॅपटॉपला थंड ठेवण्यासाठी काही ना काही उपाय करायलाच हवे. लॅपटॉप कधीच तुमच्या शरीराच्या संपर्कात ठेवू नका. याशिवाय लॅपटॉप एखाद्या पुस्तकावर अथवा कुलींगपॅडवर ठेवावा.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर पाच TIPS