आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘डिजिटल इंडिया’च्या पार्श्वभूमीवर सव्वालाख लँडलाइनची घरवापसी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - केंद्र सरकारने नुकतीच ‘डिजिटल इंडिया’ या योजनेची घोषणा केली. मात्र सेवेचा दर्जा असमाधानकारक असल्याने बीएसएनएलच्या लँडलाइनची मात्र मोठ्या प्रमाणात घरवापसी सुरू आहे. गेल्या वर्षभरात सव्वालाख ग्राहकांनी बीएसएनएलची लँडलाइन सेवा परत केल्याची कबुली बीएसएनएलचे मुख्य महासंचालक प्रदीपकुमार होटा यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. आगामी काळात सेवेचा दर्जा सुधारून पुन्हा मुख्य प्रवाहात उतरू, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. केंद्र शासनाच्या ‘डिजिटल इंडिया योजने’अंतर्गत देशात विविध ठिकाणी ‘वायफाय झोन’ तयार करण्यात येत आहेत. त्यानुसार पुणे शहरातील १४ ठिकाणांची वायफाय झोन म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड सुविधा पुरवण्यात येणार आहे. या माध्यमातून सर्वांना सरकारी योजनांची माहिती मिळणे सुकर होईल.