आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bug In Samsung Keyboard App May Affect You Mobile

SAMSUNG चे 60 कोटी मोबाईल होऊ शकतात हॅक, किबोर्ड अॅपमध्ये आला BUG

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅमसंग कंपनीचा मोबाईल वापरणाऱ्या युजर्सना समस्यांना सामोरे जावे लागू शकते. सॅमसंगच्या अॅंड्राईड किबोर्ड अॅपमध्ये बग आल्याची माहिती मिळाली आहे. या बगमुळे तब्बल 60 कोटी सॅमसंग मोबाईल हॅकर्सच्या नियंत्रणात येऊ शकतात. हा सिक्युरिटी बग अॅंड्राईड बिल्ट इन 'स्विफ्ट की' किबोर्ड अपडेटच्या माध्यमातून मोबाईलमध्ये आला आहे. सामान्य अपडेटसारखा तो दिसतो. पण आहे धोकादायक.
का आहे धोकादायक
मोबाइल सिक्युरिटी कंपनी NowSecure नुसार हा बग धोकादायक आहे. किबोर्ड अॅप बिल्ड इन असल्याने त्याला अनइन्स्टॉल करणे शक्य नाही. त्यामुळे युजर्स या बगपासून सुटका करुन घेऊ शकत नाहीत.
काय असतो बग
सॉफ्टवेअर बग म्हणजे एखादा एरर, फेल्युअर किंवा फॉल्ट राहू शकतो. यामुळे काही सॉफ्टवेअर व्यवस्थित काम करीत नाहीत. आपल्याला योग्य ती सेवा ते सॉफ्टवेअर देऊ शकत नाहीत. त्याचा फटका आपल्या मोबाईल वापराला बसतो.
कोण कोणते डिव्हाईस आहेत इनफेक्टेड
या बगमुळे गॅलेक्झी सिरिजमधील S6, S5, S4, S4 मिनी आणि सर्व प्रकारचे हाय-एंड डिव्हाईन इनफेक्टेड होऊ शकतात. येत्या काही दिवसांमध्ये ही समस्या सोडविली जाईल, असे सॅमसंगने सांगितले आहे. स्विफ्टकी कंपनीसोबत सॅमसंगचे इंजिनिअर काम करीत आहेत, असेही सांगण्यात आले आहे.
मोबाईलमधील डिटेल्स चोरी होण्याचा धोका
या सिक्युरिटी बगमुळे युजर्सच्या मोबाईलमध्ये सेव्ह असलेले बॅंक अकाऊंट डिटेल्स, क्रेडिट कार्ड क्रमांक, खासगी माहिती आदींची चोरी होऊ शकते. शिवाय युजर्सचे ईमेल आणि पासवर्ड क्लूही चोरी होऊ शकतात. सॅमसंगला याबाबत डिसेंबर 2014 मध्येच माहिती मिळाली होती, असेही NowSecure ने सांगितले आहे.
कसे वाचता येईल
या बगपासून वाचण्यासाठी सुरक्षित नसलेल्या वाय-फाय नेटवर्कपासून मोबाईल दूर ठेवा, असे NowSecure ने सांगितले आहे. तसेच डिव्हाईसमध्ये स्विफ्टकी अॅप अपडेट करु नका.