आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Coolpad Launches Note 3 Lite With 3gb Ram At Rs 6999

3GB रॅम, फिंगरप्रिंट सेन्सर, Coolpad चा नवा फोन आलाय, किंमत 6999 रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिनी स्मार्टफोन कंपनी कूलपॅडने आपला नवा स्मार्टफोन Note 3 Lite भारतात सादर केला आहे. तिची किंमत 6 हजार 99 रुपये आहे. हा हँडसेट खास ई-कॉमर्स संकेतस्थळ अॅमेझॉन इंडियावर उपलब्ध देणार आहे. Note 3 Life ची विक्री फ्लॅश सेलच्या माध्‍यमातून केली जाईल. त्यासाठी आज संध्‍याकाळपर्यंत 5 वाजेपर्यंत नोंदणी करावी लागेल. फ्लॅशसेल 28 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजल्यापासून होईल.
हा स्मार्टफोन बाजारात आणण्‍यासाठी आणि फीचर्स सांगण्‍यासाठी कुलपॅडचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी ली बिन उपस्थित होते. त्यांनी भारतीय बाजारपेठेचा विचार करुन व्युहरचना सांगितली. आम्हाला आनंद होत आहे, की आम्ही भारत सरकारच्या 'मेक इन इंडिया' उपक्रमासाठी योगदान देत आहोत. कंपनीने व्हिडिओकॉनशी सहकार्य करार केला आहे. या अंतर्गत आम्ही स्मार्टफोन्सचे उत्पादन भारतातच करणार आहोत. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत 10 लाख कुलपॅड हँडसेट्स भारतात उत्पादित करणार आहोत.
फोनची वैशिष्‍ट्ये...
यात फिंगरप्रिंट सेंसर आहे. याने फोन 5 सेकंदात अनलॉक होतो. ते बॅक पॅनलवर आहे. 360 डिग्री फिंगर रोटेशन कॅपेसिटी सपोर्ट करते. आतापर्यंत महागड्या स्मार्टफोन्समध्‍येच फिंगरप्रिंट स्कॅनर फीचर पाहता येते. भारतात फिंगरप्रिंट सेन्सर असणारा हा सर्वात स्वस्त फोन आहे. तो ऑक्टोबर 2015 मध्‍ये सादर झालेला कुलपॅड नोट 3 चा अपडेटेड व्हर्जन आहे.
या हँडसेट्सला देईल टक्कर :
कुलपॅडने नुकतेच आपला नोट 3 बाजारात आणला होता. त्यात फिंगरप्रिंट सेन्सर आहे. या स्मार्टफोनची किंमत 8 हजार 999 रुपये आहे. आता कुलपॅडचे फिंगरप्रिंट सेन्सर असणारे हे दोन हँडसेट्स (नोट 3 आणि नोट 3 लाइट) Meizu MX5, वनप्लस 2 आणि ऑनर 7 सारखे हँडसेट्सला टिक्कर देईल. त्यांची किंमत अनुक्रमे 19 हजार 999 रुपये, 24 हजार 999 रुपये आणि 22 हजार 999 रुपये आहे.
कुलपॅड नोट 3 लाइटचे फीचर्स...
- डिस्प्ले - 5 इंच एचडी डिस्प्ले
- प्रोसेसर - एमटी 6753 64 बीट
- रॅम - 3 जीबी
- मेमरी - 16 जीबी
- कॅमेरा - 13 आणि 5 मेगापिक्सल
- बॅटरी - 2500 mAh पॉवर

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्‍या कूलपॅड नोट 3 लाइटचे सविस्तर फीचर्स आणि इवेंटचे छायाचित्रे...