आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Coolpad To Launch A Smartphone With Fingerprint Scanner

फिंगरप्रिट सेन्सर असलेला नवा स्मार्टफोन, असेल 3 GB रॅमचा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतीकात्मक फोटो - Divya Marathi
प्रतीकात्मक फोटो
चिनी स्मार्टफोन निर्माता कुलपॅडने गेल्या आठवड्यात भारतात आणखी एक स्मार्टफोन बाजारात सादर केला आहे. या हँडसेटच्या नावाबाबत माहिती गुलदस्त्यात आहेत. कंपनी कुलपॅड नोट 3 चे अपडेटेड व्हर्जन असू शकते. कारण कुलपॅड नोट 3 ने भारतात प्रचंड यश मिळवले आहे.
फिंगरप्रिंट सेन्सर असेल यूएसपी...
सोशल मीडियावर फीचर्स लीक झाल्याने कुलपॅडच्या या नव्या हँडसेटमध्‍ये फिंगरप्रिंट सेन्सर असेल असे कळते. जर ही अफवा खरी ठरल्यास तर फोनमधील ही सर्वात चांगली यूएसपी ठरेल. फिंगरप्रिंट सेन्सरमुळे फोन लॉक आणि अनलॉक केला जाऊ शकतो. इतर चिनी कंपन्या महागड्या स्मार्टफोन्समध्‍ये ही सुविधा देते.
ही असतील फीचर्स :
लीक झालेली फीचर्सनुसार, या हँडसेटमध्‍ये 3 जीबी रॅम असे शकते. मात्र काही बातम्यांमध्‍ये 2 जीबी रॅम असण्‍याचा अंदाज वर्तवला आहे. जर फोनमध्‍ये 3 जीबी रॅम असल्यास त्यांचा यूजर्सला फायदा होईल. याने मल्टीटास्किंगच्या वेळी फोन हँग होणार नाही. तसेच स्मार्टफोनच्या कामाची गती बरीच वाढेल आणि चांगला बॅटरी बॅकअप राहिल.
कोणत्या कंपन्यांशी स्पर्धा -
कुलपॅडने नुकतेच आपला नोट 3 सादर केला होता. त्यात फिंगरप्रिंट सेन्सर आहे. नोटची किंमत 8 हजार 999 रुपये आहे. सेन्सरची सुविधा असलेला भारतातील स्वस्त असा हा हँडसेट असेल. फिंगरप्रिंट सेन्सरसह येणा-या Meizu MX5 ची किंमत 19 हजार 999 रुपये, वनप्लस 2 ची किंमत 24 हजार 999 रुपये आणि हुआवेई ऑनर 7 ची किंमत 22 हजार 999 रुपये.
वनप्लस, हुआवेई आणि श्‍याओमी सारख्‍या कंपन्या नेहमी भारतात नव-नवीन फीचर्स आणि कमी किंमतीत आपली हँडसेट्स सादर करत असतात. कुलपॅडने इतर कंपन्यांना मागे टाकत सर्वात स्वस्त फिंगरप्रिंट सेंसर असलेला स्मार्टफोन बाजारात सादर केला आहे. यामुळे भारतीय युजर्स आणि तंत्रज्ञान तज्ज्ञांची कंपनीकडून अपेक्षा वाढल्या आहेत.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्‍या कूलपॅड नोट 3 ची फीचर्स...