आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅप इंडस्ट्री नोकऱ्यांचा नवा राजमार्ग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मायक्रोसॉफ्ट, गुगल, नोकिया यांच्यासह जगभरातील प्रमुख कंपन्या खास प्रशिक्षण देऊन कल्पक अॅप डेव्हलपर्स तयार करण्यात गुंतल्या आहेत. उत्पादनांचा दर्जा अत्युच्च असावा यासाठी या कंपन्या प्रचंड गुंतवणूकही करत आहेत. याच कारणांमुळे सध्याचा काळ अॅप इंडस्ट्रीसाठी विस्तारण्याचा ठरणार आहे.
नवनवीन अॅप्समुळे व्यवसाय वृद्धीसाठी करावयाच्या उपाययोजनांचे परिमाण बदलले असून यासोबत देशातील तरुणांना नोकऱ्यांची संधीही उपलब्ध झाली आहे. ही इंडस्ट्री देशातील युवकांसह प्रोफेशनल्सना आकर्षक करिअरही देत आहे. आयएएमएआय आणि आयसी आरआयईआरचा नवीन अहवालही हेच सांगतो. या अहवालानुसार सन २०१६ पर्यंत या इंडस्ट्रीत थेट करिअर संधीचा आकडा १,५१,२३० ते १,५९,०१०च्या दरम्यान असेल. एवढेच नव्हे, तर पुढील वर्षापर्यंत ही इंडस्ट्री सहा लाखांपेक्षा जास्त नोकऱ्या उपलब्ध करून देईल. सध्या अॅप सेक्टर ७५ हजार नोकऱ्या देत आहे.
काय आहे कारण ?
मोबाइल अॅप्लिकेशनच्या विक्रीची बाजारपेठ विस्तारत आहे. बहुतांश कंपन्या आपला व्यवसाय वाढवण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानात गुंतवणूक करत आहे. आईएएमएआई, केपीएमजीच्या रिपोर्टनुसार सन २०१६-१७ पर्यंत भारतात क्रमश: २३ कोटी ६० लाख आणि ३१ कोटी ४० लाख मोबाइल इंटरनेट युजर असतील. यासह डाऊनलोड केल्या जाणाऱ्या अॅप्सच्या संख्येतही प्रचंड वाढ होईल. मोबाइल इंटरनेटची वाढती बाजारपेठ अॅप तयार करू शकणाऱ्या कल्पक तरुणांसाठी पायघड्या अंथरत आहे.
नोकऱ्यांसह अप्रत्यक्ष रोजगार संधी
अॅप निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणारे साॅफ्टवेअर इंजिनिअर्स, युजर इंटरफेस डेव्हलपर्स, डिझायनर्स आणि इतर आयटी प्रोफेशनल्स यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. सेल्स आणि मार्केटिंग, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, फायनान्स, अकाउंट्स आदींद्वारे अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील.
ई-कॉमर्समुळे मागणीत वाढ
२०१४ मध्ये २२०० कोटी डॉलरची ई कॉमर्स इंडस्ट्री २०१८ पर्यंत ८६०० कोटी डॉलरची होईल. या वाढीचे श्रेय मोबाइल अॅप्लिकेशन्सलाही असेल. विशेष म्हणजे २०१४ मध्ये मोबाइलद्वारे होणारी ई-कॉमर्स विक्री ४१ टक्के आहे. त्यामुळेच भविष्यात अॅप निर्मितीमध्ये गुंतलेल्या तरुणांना यशाचा राजमार्गच खुला होणार आहे.
खुले होणार सुवर्णसंधीचे दालन
नॅसकॉम स्टार्टअप प्रोग्राम संचालित करत आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर १०,००० स्टार्ट अप्स तयार होतील. ज्यामुळे अॅपनिर्मितीला पोषक वातावरण मिळेल. "डिजिटल इंडिया'च्या माध्यमातून गुड गव्हर्नन्स, स्मार्ट सिटीज, ई-व्हिसा अशा महत्त्वाकांक्षी योजना अॅप तयार करणाऱ्यांना सुवर्णसंधी देतील.
इंजिनिअर, मोबाइल यूआय डिझायनर व मोबाइल आर्किटेक्टच्या रूपात प्रोफेशनल्ससाठी या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. याहू, फेसबुक, गुगल इंडियासारख्या अनेक प्रतिष्ठित कंपन्या अॅप डेव्हलपर्सना आकर्षक प्रस्ताव देत आहेत.
नवकल्पनांना व्यासपीठ
आयसीआर आयईआरच्या सर्व्हेनुसार ७५ टक्के अॅप डेव्हलपर्स ३५ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. युटिलिटी, सोशल नेटवर्किंग, एंटरटेन्मेंट, एज्युकेशन आणि ई-कॉमर्स या क्षेत्रांवर या डेव्हलपर्सचे खास लक्ष आहे. अनेक नवयुवक गेमिंग, एंटरटेन्मेंट आणि युटिलिटी अॅपच्या निर्मितीमध्ये गुंतले आहेत.
क्षमतांना आव्हान
वेब बेस्ड डिव्हाइसेससाठी अॅप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर तयार करणे म्हणजेच अॅप डेव्हलपमेंट होय. अँड्रॉइड, आयओएस, विंडोजवर चालणारे मोबाइल अॅप्लिकेशन डेव्हलपर्सद्वारे तयार केले जातात. कॉम्प्युटर सायन्स ग्रॅज्युएट (बीई/बीटेक) व एमसीए करणाऱ्यांसाठी या क्षेत्रात अनेक संधी आहेत. यासह ऑनलाइन सर्टिफिकेट कोर्सद्वारे इतर क्षेत्रातील युवकही या संधीचा लाभ घेऊ शकतात. एवढ्याशा मोबाइल स्क्रीनवर तुम्ही किती ऑप्शन्स किती सुरेख स्वरूपात मांडू शकता, हेच कौशल्य तुम्हाला एक उत्कृष्ट अॅप डेव्हलपर बनवते. आर्थिक गुंतवणूक न करताच युनिक आयडिया तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवून देईल.
तगडा पगारही मिळवा
अॅप डेव्हलपर म्हणून करिअर सुरू करू पाहणाऱ्यांना साधारणत: तीन ते पाच लाखांचे वार्षिक पॅकेज मिळू शकते. अर्थात वाढता अनुभव आणि कल्पकतेवर ही रक्कम सातत्याने वाढत राहते.
अॅप डेव्हपलर्सची गरज
देशात अॅप इंडस्ट्री वेगाने वाढतेय. त्यामुळे २०२० पर्यंत दोन कोटी अॅप डेव्हपलर्सची गरज भासणार आहे. सुभो रे, प्रेसिडेंट, आयएएमएआय