आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FB ची कमाई 35 हजार कोटी, एवढा वेळ रोज ऑनलाइन राहातात लोक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकचे पहिल्या तिमाहीतील उत्पन्न आपेक्षेपेक्षा जास्त झाले आहे. त्यांचे उत्पन्न 52% वरुन वाढून 5.38 अब्ज डॉलर (अर्थात 35 हजार कोटी रुपये) झाले आहे, मागील वर्षी याच काळात फेसबुकला 3.54 अब्ज डॉलर मिळाले होते. कंपनीला सर्वाधिक फायदा मोबाइल अॅडमधून मिळाला आहे. फेसबुकचे को-फाऊंडर मार्क झुकेरबर्ग म्हणाले, जगभरातील लोक रोज साधारण 50 मिनिटे फेसबुक, इंन्स्टाग्राम आणि मॅसेंजरवर घालवत आहेत.

असा भरला फेसबुकचा खिसा
- फेसबुकला सर्वाधिक रेव्हेन्यू अॅडमधून मिळाला आहे. फेसबुकचे अॅडच्या माध्यमातून होणारे वार्षिक उत्पन्न 57% वरुन वाढून 5.2 अब्ज डॉलर झाले.
- एकूण जाहिरातीच्या कमाईतून होणाऱ्या उत्पन्नापैकी मोबाइल अॅडचा वाटा 82% राहिला.
- फेसबुकचे सीओओ शेर्ली सेंडबर्ग यांनी सांगितले, की गेल्यावर्षी याच काळात मोबाइल अॅडचा वाटा 73% होता.
- त्यांनी सांगितले की 30 लाखांपेक्षा जास्त बिझनेस फेसबुकच्या अॅड प्रॉडक्टसचा वापर करत आहेत.
- 2 लाखांपेक्षा जास्त बिझनेस इंस्टाग्रामच्या यूजर्सकडून येत आहे.
- 'स्मॉल स्केल आणि मध्यम बिझनेसकडून येणाऱ्या जाहिरातीतून मोठे उत्पन्न होत आहे.'
- तसेच फेसबुकचे नेट प्रॉफिट 52% वरुन वाढून 1.51 अब्ज डॉलर झाले, गेल्या वर्षी याचवेळी हा आकडा 51.2 कोटी डॉलर एवढा होता.

फेसबुक यूजर्स वाढले
- फेसबुकने सांगितले, की मंथली अॅक्टिव्ह यूजर्स (एमएयू) पहिल्या तिमाहीत 1.65 अब्ज झाले आहेत.
- वार्षिक मोबाइल एमएयू 21% वरुन वाढून 1.51 अब्ज झाले आहे.
- फेसबुक, इंस्टाग्राम आणि मॅसेंजर यांचा लोक रोज किमान 50 मिनिटे वापर करत आहेत.
- त्यात व्हॉट्सअॅपचा समावेश नाही.
पुढील स्लाइडमध्ये, एफबीचा जाहिरात दर वाढला