आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्‍या FB वर येऊ शकतो या व्‍हायरसव्‍दारे अश्‍लील व्‍हिडिओ, या बाबी काळजीपूर्वक टाळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील काही दिवसांपासून फेसबुकवरील एका व्हायरसने सर्वांना हैराण करुन सोडले आहे. फेसबूकच्या मेसेज बॉक्सच्या माध्यमातून हा व्हायरस सध्या व्हायरल झाला आहे. अनेकजण या प्रकारामुळे नाकीनऊ आले आहेत. या व्‍हायरसमुळे काही जणांच्या फेसबूक वॉलवर आपोआप अश्‍लील व्‍हिडिओ पोस्‍ट होत असल्‍याचे दिसत आहे. अत्‍यंत वेगाने पसरणा-या या व्‍हायरसपासून आपल्‍याला सुरक्षित राहायचे असेल तर या बाबींकडे काळजीपूर्वक लक्ष द्या.

काय आहे व्‍हायरसचे प्रकरण....
- तुमच्या मित्राच्या अकाऊंटवरुन तुम्हाला मेसेज बॉक्समध्ये एखादा व्हिडिओ येतो.
- या व्‍हिडिओवर तुम्‍ही क्‍लिक केल्‍यास तुमच्‍या अकाउंटवरून तुमच्‍या मित्रांना आपोआप हा व्‍हिडिओ पाठवला जातो.
- काही जणांच्‍या फेसबूक वॉलवरही आपोआप अशा प्रकारचे व्‍हिडिओ पोस्‍ट होताना दिसत आहेत.
- या व्‍हायरसमुळे तुमचे फेसबूक अकाऊंटही हॅक होण्‍याची शक्‍यता आहे.
- व्‍हायरसच्‍या लिंकवर यूझरने क्‍लिक केल्‍यास त्‍याच्‍या वॉलवर अनेकवेळा हा व्‍हिडिओ पोस्‍ट होताना दिसत आहे.
- शिवाय फ्रेंडलिस्‍टमधील मित्रांना अश्‍लील व्‍हिडीओ आपोआप टॅग होत आहे.
सोशल मीडियावर जनजागरण....
- या व्‍हायरसबाबत सध्‍या सोशल मीडियावरून जनजागरण करण्‍यात येत आहे.
- सुरुवातीला हा प्रकार लक्षात न आल्‍याने अनेकांचा गोंधळ उडाला होता.
- अश्‍लील व्‍हिडीओमुळे नाहक मित्र मैत्रीणींमध्‍ये गैरसमज होऊ नये म्‍हणून खूलासे पोस्‍ट होताना दिसताहेत.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, कसा ओळखावा हा व्‍हायरस.., या बाबी करू नये....