आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Facebook\'s Internet.org Expands In India, Net Neutrality News In Marathi

Internet.orgची कक्षा रुंदावली, डेव्हलपर्ससाठी \'फेसबुक\'चा नवा प्लॅटफॉर्म

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- युजर्सच्या मागणीनुसार दररोज काहीतरी नवीन बदल करणार्‍या 'फेसबुक' आणखी एक पाऊल टाकले आहे. ते म्हणजे 'फेसबुक'ने आपली सर्व्हिस Internet.org च्या कक्षा रुंदावत आज (सोमवार) ओपन प्लॉटफॉर्म सुरु केला आहे. ऑनलाइन कंटेंट आणि अॅप्लिकेशन डेव्हलपर्स जोडण्यासाठी 'फेसबुक' या अॅप्लिकेशनची मोठी मदत होणार आहे.

'फेसबुक'च्या या नव्या प्लॉटफॉर्ममध्ये अनेक डेव्हलपर्स सहभागी होऊ शकतात. कमी उत्पन्न असलेले आणि ग्रामीण भागातील लोकांना ऑनलाइन आणण्याचा 'फेसबुक'चा यामागे उद्देश आहे. मात्र, युजर्सला निर्धा‍रित करण्‍यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करावे लागेल, असे 'फेसबुक'च्या सूत्रांनी सांगितले आहे.

सध्या देशात नेट न्यूट्रॅलिटीच्या मुद्द्यावरून रान पेटले आहे. त्यात 'फेसबुक'ने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. फेसबुकने Internet.org ला लॉन्च करण्‍यासाठी गेल्या फेब्रुवारीत रिलायन्स कम्युनिकेशन्ससोबत करार केला आहे. दरम्यान, Internet.org वर नेट न्यूट्रॅलिटी आणि फ्री इंटरनेट नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोपावरून अनेक ई-कॉमर्स कंपनी आणि कंटेंट डेव्हलेपर्स 'फेसबुक'च्या हा प्लॉटफॉर्मला हटवण्याची घोषणा केली आहे.
Internet.org चे प्रॉडक्ट व्हाइस प्रेसिडेंट क्रिस डेनियल्सनी सांगितले की, देशात सुरु असलेल्या नेट न्यूट्रॅलिटीविषयी ऐकले असून त्यावर आपण लक्ष ठेवून आहे. 'नेट न्यूट्रॅलिटीचा तत्त्व आणि युजर्सला ऑनलाइन आणण्‍यासाठी प्रेरित करणार्‍या कार्यक्रमाचे अस्तित्त्व आवश्यक आहे.
'फेसबुक'ने ही सर्व्हिस भारतासह नऊ देशांमध्ये सुरु केली आहे. यामाध्यमातून 80 लाख नवे युजर्स ऑनलाइन आणले असल्याचा दावा डेनियल्सनी केला आहे.
काय आहे Internet.org?
Internet.org हे एक मोबाइल अॅप्लिकेशन आहे. या माध्यमातून मोबाइलवर मोफत बेसिक इंटरनेट सुविधा पुरवली जाते. याशिवाय 'फेसबुक'ची साइट आणि मेसेजिंग सर्व्हिससाठी युजर्स या अॅप्लिकेशनचा मोफत वापर करू शकतात.

विरोध कशासाठी?
Internet.org या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून काही ठराविक साइट्‍स एक्सेस केल्या जातील. एखादी गोष्ट सर्च करण्यासाठी युजर्सला गूगलच्या व्यतिरिक्त मायक्रोसॉफ्टच्या 'बिंग'चा वापर करावा लागेल. गुगलचा वापर करण्‍यासाठी युजर्सला वेगळा शुल्क मोजावा लागेल. याशिवाय, जॉब सर्चसाठी 'बाबा जॉब्स' वेबसाइट मोफत उपलब्ध असेल. मात्र, 'नोकरी डॉट कॉम' तसेच अन्य दुसर्‍या साइट सर्च करण्‍यासाठी वेगळा शुल्क मोजावा करावा लागेल.