आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॅमसंगने लॉंन्‍च केले सर्वात स्लिम टॅबलेट्स, आहे 8 MP कॅमेरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅझेट डेस्‍क- सॅमसंग कंपनीने टॅबलेट सिरिज वाढवत गॅलक्‍सी टॅब s2 रेंज टॅबलेट लॉंन्‍च केला आहे. हा टॅबलेट जगभरातील टॅबलेटपेक्षा सर्वात स्लिम असल्‍याचे कंपनीने सांगितले आहे. हा टॅबलेट आयपॅड एअर 2, सोनी एक्‍सपीरिया z4 टॅबलेट आणि डेल वेन्‍यू 87000 पेक्षा स्लिम असल्‍याचे कंपनीने सांगितले आहे. गॅलक्‍सी s2 सिरिज टॅबलेट ऑगस्‍टपासून मार्केटमध्‍ये येणार आहे. या टॅबलेटची किंमत कंपनीने अद्याप जाहिर केलेली नाही.

सॅमसंगचे दोन्‍ही s2 टॅबलेट मेटल फ्रेममध्‍ये उपलब्‍ध आहेत. याची थिकनेस रेंज 5.6mm आहे. या आधीचे टॅबलेट अॅपल, सोनी आणि डेल 6.1mm रेंजपर्यंत स्लिम होते. या टॅबलेटचा रिअल कॅमेरा 8 मेगापिक्‍सल आणि 2.1 मेगापिक्‍सल फ्रंट कॅमेरा आहे. गेल्‍या वर्षी लॉंन्‍च झालेल्‍या दोन आयपॅड सारखे सॅमसंगने s2 टॅबलेटमध्‍येही मॉडल्‍समध्‍ये फिंगरप्रिंट स्‍‍कॅनर दिला आहे.
पुढील स्‍लाइडवर क्लिक करून पाहा गॅलक्‍सी s2 सिरिज टॅबलेट...
बातम्या आणखी आहेत...