आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinese Smartphone Maker Gionee Launched Elife E7 In Indian Market Costing Rs 24999

Gionee ने लॉन्च केला सर्वांत स्लिम फोन, दोन दिवसांचा बॅटरी बॅकअप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- Gionee ने आपला नवा फ्लॅगशिप स्फार्टफोन Elife S7 हा भारतात शनिवार लॉन्च केला. Elife S7ची जाडी 5.4 मिलिमीटर असून हा जगातील सर्वांत स्लिम स्मार्टफोन आहे. विशेष म्हणजे हा फोन दोन दिवसांचा बॅटरी बॅकअप आहे.
हैदराबाद येथील एका इव्हेंटमध्ये हा फोन सादर करण्यात आला. यावेळी माजी क्रिकेटपटू आणि खासदार नवज्योत सिंह सिद्धू उपस्थित होते.

Elife S7 मधील वैशिष्ट्ये...
* मेटल फ्रेम
* शानदार कॅमेरा
* अँड्रॉइड लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टम आणि नवे यूजर इंटरफेस
* दोन दिवसांचा बॅटरी बॅकअप

किंमत-
Gioneeच्या नव्या फोनची किंमत 24,999 रुपये आहे. Gioneeने गेल्या महिन्यांत बार्सिलोनामध्ये (स्पेन) झालेल्या मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेसमध्ये हा फोन सादर केला होता.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, Elife S7चे स्मार्ट फीचर्स...