आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gionee Launches S Plus Smartphone With Face Unlock Option

चेहरा बघून सेकंदात अनलॉक होईल स्मार्टफोन, किंमत केवळ 16,999

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
16,999 रुपयांना जिओमीने एस-प्लस नावाचा स्मार्टफोन बाजारात लॉंच केला आहे. चालू महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून याची विक्री केली जाणार असून खास भारतीयांसाठी फेस अनलॉक सारखे विशेष फिचर्स देण्यात आले आहेत. दिवाळीतील स्मार्टफोन बाजारपेठेतील मोठी उलाढाल समोर ठेवून हा फोन सध्या लॉंच करण्यात आला आहे.
एस-प्लसला युएसबी टाईप-सी पोर्ट देण्यात आला आहे. डार्क ब्लू, व्हाईट आणि गोल्डन या तीन कलरमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध होणार आहे. फेस अनलॉक हे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तरुणाईला आकर्षित करणारे फिचर यात देण्यात आले आहे.
ड्युअल सिम असलेल्या या स्मार्टफोनमध्ये अॅंड्राईड 5.1 लॉलिपॉप ओएस आहे. 5.5 इंच एचडी (720x1280) सुपर अमोल्ड स्क्रिनमध्ये कॉर्निंग गोरिला ग्लास 3 डोळ्यांच्या संरक्षणासाठी देण्यात आली आहे. 1.3GHz प्रोसेसर, 3GB रॅम, 16GB इनबिल्ट स्टोरेज, मायक्रो एसडी कार्ड (64GB पर्यंत वाढवता येईल असे.) यात आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या जिओमी एस-प्लसचे इतर फिचर्स... काय म्हणाले- जिओमी इंडियाचे मुख्य व्यवस्थापक....