आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Google Gmail Now Allows Users To Block Email Ids

GOOGLE चे नवे फीचर, नको असलेले E MAIL करता येतील BLOCK

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन Google ने 'ब्लॉक' व 'अनसब्सक्राइब' फीचर लॉन्च केले आहे. या फीचरच्या मदतीने Gmail यूजर्स नको असलेले ईमेल आयडीज व न्यूजलेटर्सला तत्काळ अनसब्सक्राइब करू शकतील.

पुढील आठवड्यात नवे फीचर वेबसह अँड्रॉयडवर उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या फीचरमुळे यूजर्सची वारंवार येणार्‍या इमेल पासून सुटका होणार आहे.
काही दिवसांपूर्वी Google ने मेलची डिलिव्हरी थांबवण्यासाठी 'अनडू फीचर्स' लॉन्च केले होते.
असे काम करेल नवे फीचर
Google ने दिलेल्या माहितीनुसार, यूजर जे ईमेल अॅड्रेस रिजेक्ट करेल, त्यावरून येणारे सर्व मेल्स स्पॅम फोल्डरमध्ये जातील. कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर हर्ष सोमांची यांनी सांगितले की, सेटिंगमध्ये जाऊन यूजर याला पुन्हा अनब्लॉकही करू शकतो. नव्या फीचरच्या मदतीने वारंवार येणार न्यूजलेटर्स देखील युजर ब्लॉक करू शकतो.

काय आहे अनडू फीचर?
मागील जूनमध्ये Google ने 'अनडू' फीचर लॉन्च केले होते. या फीचरच्या मदतीने यूजर्स सेंड बटन क्लिक केल्यानंतर 30 सेकंदांच्या आत मेलची डिलिव्हरी कॅन्सल करू शकतो.

दरम्यान, Gmail हे जगातील मोस्ट पॉप्युलर ईमेल सर्व्हिस आहे. जगभरात 900 मिलियन यूजर्स याच वापर करतात.