आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Googleचा पहिला स्मार्टफोन Pixel लॉन्च; 13 ऑक्टोबरपासून बुकिंग, अनलिमिटेड डेटा सेव्हिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅन फ्रान्सिस्को- Google ब्रॅंडने आपला पहिला न्यू जनरेशन स्मार्टफोन बाजारात उतरवला आहे. Google Pixel आणि Google Pixel XL असे दोन व्हेरिएंट लॉन्च केले आहेत. भारतात येत्या 13 ऑक्टोबरपासून या फोनची बुकिंग सुरु होईल.

फ्लिपकार्ट, रिलायन्स डिजिटल आणि क्रोमा स्टोअर्समध्ये हा फोन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या फोनची किंमत जवळपास 57 हजार रुपये असेल.

इनबिल्ट असिस्टन्ट असलेला जगातील पहिला स्मार्टफोन...
Google Pixel हा इनबिल्ट असिस्टेंट असलेला जगातील पहिला स्मार्टफोन आहे. क्लाउड कॉम्प्युटिंगच्या माध्यमातून युजर्सला अनलिमिटेड डेटा सेव्ह करता येणार आहे. गुगल प्रीमियम हँडसेटमध्ये आयफोन आणि सँमसंगला थेट टक्कर देण्याची शक्यता नाकाराता येत नसल्याचे एक्सपर्ट्‍सनी सां‍गितले आहे.
ही आहेत खास वैशिष्ट्ये...
- 32 जीबी इंटर्नल स्टोरेज असलेल्या Google Pixelची किंमत जवळपास 57 हजार रुपये तर 128 जीबी इंटर्नल स्टोरेज असलेल्या Google Pixel ची किंमत जवळपास 66 हजार रुपये असू शकते.
- 32 जीबी इंटर्नल स्टोरेज असलेल्या Pixel XL ची किंमत 67 हजार रुपये तर 128 जीबी इंटर्नल स्टोरेज असलेल्या Pixel XL ची किंमत 76 हजार रुपये आहे.
- गुगलने पहिल्यांदा स्मार्टफोनची मॅन्युफॅक्चरिंग केली आहे. यापूर्वी गूगलने एचटीसीच्या मदतीने स्मार्टफोन बाजारात आणला होता.
- कंपनीने भारतात एक वेगळी मार्केट स्ट्रॅटजी बनवली आहे. ती म्हणजे, 30 शहरांमध्ये 54 सर्व्हिस सेंटर सुरु करण्यात येत आहेत.

पुढील स्लाइडवर वाचा, Google Pixel, Pixel XL चे स्पेसिफिकेशन...
बातम्या आणखी आहेत...