आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2G वरही गुगल विनाबफरिंग दाखवणार व्हिडिओ, भारतीय युजर्ससाठी गुगलचा यू-ट्यूब गो अॅप लाँच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१.३० अब्ज लोक यू-ट्यूब वापरतात जगभर. - Divya Marathi
१.३० अब्ज लोक यू-ट्यूब वापरतात जगभर.
नवी दिल्ली - ‘मजे उड़ाओ, डाटा नहीं’ हा गुगलचा नवा नारा आहे. त्यांनी भारतीय यूजर्ससाठी एक खास अॅप्लिकेशन सादर केले आहे. नाव आहे यू-ट्यूब गो. कमी वेगाच्या इंटरनेटवरही यू-ट्यूब व्हिडीओ डाउनलोड करणे, ऑफलाइन पाहणे आणि कमी डाटा खर्च ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. गूगलने इंटनेट कनेक्टिव्हिटी खूपच कमकुवत असलेल्या भागासाठी हा अॅप आणला आहे.
गूगलने दिल्लीतील कार्यक्रमात हॅशटॅग गूगल फॉर इंडियात यूट्यूब गोची घोषणा केली. यू-ट्यूबच्या प्रॉडक्ट मॅनेजमेंट उपाध्यक्ष जोहाना राइट म्हणाल्या, ‘हा नवा अॅप आहे. त्याद्वारेे पुढच्या पिढीचे यूजर्स व्हिडीओ शेअर व एन्जॉय करतील.’ २ जी इंटरनेट कनेक्शनवरही विना बफरिंग व्हिडीओ दिसेल, असा गूगलचा दावा आहे. भारतात सध्या यूजर्स या अॅपला साइनअप करू शकतात. अधिकृत लाँचिंग कधी होईल हे सांगण्यात आले नाही.
नवीन अॅपमध्ये काय?
{मेन स्क्रीनवर पॉप्युलर कंटेंट,सर्च ऑप्शनमध्ये आवडीचे व्हिडीओ.
{डाउनलोडिंग खूपच काँप्रेस होईल. कमी डाटात जास्त व्हिडीओ दिसतील.
{व्हिडीओ डाउनलोडपूर्वी प्रिव्ह्यू. त्यामुळे डाटा खर्चात बचत.
{अॅपमध्ये वाय-फाय डायरेक्ट सुविधा. त्याद्वारे व्हिडीओ शेअर करता येईल.
गुगलने हे नवीन फिचर्सही लाँच केले
गुगलने कमी इंटरनेट स्पीडवर चालणारे आणखी प्रॉडक्ट्स लाँच केले. त्यात गुगल स्टेशन नावाचा नवा वाय-फाय प्लॅटफॉर्म, क्रोम वेब ब्राउजरसाठी ऑफलाइन फिचर, टू-जी नेटवर्कवर गुगल प्लेचा समावेश आहे. टू-जी नेटवर्कवर क्रोममध्ये वेबपेजेस ऑटोमॅटिक ऑप्टिमायजिंग फिचरमुळे ९०% डाटा बचत होईल.
यू-ट्यूब
१.३० अब्ज लोक यू-ट्यूब वापरतात जगभर.
३०० तासांचे व्हिडीओ मिनिटाला होतात डाउनलोड.
{एका दिवसात ५ कोटी व्हिडीओ पाहतात.
{१० पैकी ८ यूजर्सचे वय १८-४९ दरम्यान.
{१ अब्ज मोबाइल यूजर यूट्यूब व्ह्यू देतात.
{महिला यूजर्स ३८%, पुरूष यूजर्स ६२%
बातम्या आणखी आहेत...