आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Google कारचा अपघात, तब्बल 14 अपघातानंतर प्रथमच लोक जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅलिफोर्निया- बहुचर्चित Google सेल्फ ड्रायव्हिंग कारचा (विनाचालक कार) चाचणीदरम्यान दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. सहा वर्षांत 19 लाख मैलाच्या चाचणीत या कारचे तब्बल 14 लहान-मोठे अपघात झाले आहेत. कार अपघातात पहिल्यांदा लोक जखमी झाल्याची घटना घडल्याचे Googleच्या सूत्रांनी सांगितले. कॅलिफोर्नियातील रस्त्यावर 25 कार उतरवण्यात आल्या असून चाचणी घेतली जात आहे.

मिळालेली माहिती अशी की, कॅलिफोर्नियायातील माउंटेन व्ह्यूमध्ये एक जुलैला गुगलची लेक्सस एसयूव्ही दुर्घटनाग्रस्त झाली. एसयूव्ही एका चौकात उभी होती. दुसर्‍या कारने प्रतिताशी 17 मैल वेगाने या कारला धडक दिली. मात्र, धडक देणार्‍या कारचे कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र, Google कारमधील लोक किरकोळ जखमी झाले. त्यांच्या मानेला देखील हिसका बसला.
चाचणी घेताना कारमध्ये चालकासोबत इतर दोन जण होते. ते किरकोळ जखमी झाले आहेत.
दरम्यान, Google दोन सीटर कारला सामान्य रस्त्यावर धावण्यासाठी आता प्रथमच परवानगी देण्यात आली आहे. अमेरिकेतील शहर सन फ्रान्सिस्को स्थित google च्या मुख्यालयाच्या जवळील रस्त्यावर सेल्फ ड्रायविंग कारची चाचणी घेण्यात आली. याआधी ही कार शहरातील 120 किलोमीटर दूर एअरफोर्सवरील एका बेसवरील प्रायवेट ट्रकवर या कारची टेस्ट घेण्यात येत होती. एक वर्षापूर्वीच गुगलने हा प्रकल्प लोकांच्या समोर ठेवला होता.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो...