आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Officials Suspect That Might Rigging Bell Can Do A Big Financial Fraud

#Freedom251: 25 लाख फोन बुक, \'रिंगिंग बेल्स\'वर प्राप्तीकर विभागाचा छापा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोएडा- फक्त 251 रुपयांत जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन देण्याचा दावा करणार्‍या रिंगिंग बेल्स कंपनीच्या नोएडा ऑफिसवर शनिवारी प्राप्तीकर विभागाच्या अधिकार्‍यांनी पोलिसांच्या मदतीने छापा टाकला. स्वस्त फोन देण्याच्या नावाखाली काही गौडबंगाल तर नाही ना, याचा शोध घेतला जात आहे.

रिंगिग बेल्स कंपनीच्या फोनच्या किमतीवर इंडियन सेल्युलर असोसिएशनने (आयएसआय) आक्षेप घेतला आहे. आयएसआयने या फोनची किंमत 4,100 रुपये तर टेलिकॉम मिनिस्ट्रीने 2,300 रुपये सांगितली आहे. या पार्श्वभूमीवर शहानिशा करण्‍यासाठी कंपनीच्या ऑफिसवर छापा टाकण्‍यात आल्याची माहिती सूत्रांन‍ी दिली आहे.

25 लाख फोन बुक झाल्याचा कंपनीचा दावा
25 लाख फोन बुक झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. फोनची बुकींग 18 फेब्रुवारीला सकाळी सहा वाजता सुरु झाली. फोनला देशभरातील जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दोन दिवसांत कंपनीने 25 लाख युनिट ‍बुक झाल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.

पुढील स्लाइडवर वाचा...
@कंपनीशी संबंधित पदाधिकार्‍यांचे पासपोर्ट जब्त होणार?
@कंपनीला 25 लाख हॅंडसेट्‍सच्या बुकिंगमधून मिळाले 72 कोटी
@रिंगिंग बेल्स कंपनीची स्थापना झाली चार महिन्यांपूर्वी
@ Freedom 251 स्मार्टफोनचे फीचर्स...