आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या तरुणाने 30 हजारांत सुरु केला होता बिझनेस, आता 100 कोटींची आहे कंपनी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- वय २७ वर्षे, हातात इंजिनिअरिंगची डिग्री आणि काही तरी हटके करण्याचा मानस. काहीशी अशी आहे आशीष बहुखंडी याची स्टोरी. इंजिनिअरींग पूर्ण केल्यावर एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीत फॅट सॅलरीची नोकरी आशीष करु शकला असता. पण त्याला काही तरी वेगळे करायचे होते. कुटुंबाची मदत करण्यासह इतर लोकांनाही मदत करु शकले असे काही. त्यानंतर त्याने मोबाईल अॅप्स प्रमोशनचा बिझनेस सुरु केला. यासाठी ३० हजार रुपये भांडवल गुंतवले. आज त्यांची कंपनी अॅप्स डिस्कव्हर १०० कोटी रुपयांची कंपनी आहे. आता त्याची कंपनी केवळ भारतच नव्हे तर बाहेर सिंगापूर आणि इंडोनेशियातही काम करत आहे.

 

दिव्य मराठीशी बोलताना आशिषने सांगितले, की आम्ही सध्या इंडोनेशिअन मार्केटवर भर देतोय. त्या देशात कोट्यवधी रुपये गुंतवण्याची आमची योजना आहे. त्यातून मोठा नफा मिळेल असे वाटते.

 

काय करते अॅप्स डिस्कव्हर
अॅप्स डिस्कव्हर एक डिजिटल अॅण्ड नेटवर्क मार्केटिंग कंपनी असून मोबाईल अॅप्लिकेशन प्रमोशन करते. साध्या शब्दांत सांगायचे झाले, तर ही कंपनी ब्लॉग्ज आणि वेबसाईट्सवर मोबाईल अॅप्सची अॅड प्रोव्हाईड करते. एप्स डिस्कव्हर पर्सनल ब्लॉग लिहणाऱ्यांनाही अॅप्सची अॅड प्रोव्हाईड करते. यासाठी तुमचा ब्लॉग किंवा वेबसाईट किती पॉप्युलर आहे याचा काही संबंध नाही.

 

पुढील स्लाईडवर वाचा... ३० हजारांचे कसे केले १०० कोटी... असे मिळवले यश...

बातम्या आणखी आहेत...