आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Home Repairing Tips And Tricks For Smartphone Users

TIPS: मोबाईल पाण्यात पडलाय का?, तर करा हे उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः सर्व फोटो केवळ बातमीच्या सादरीकरणासाठी लावण्यात आले आहेत)
गॅझेट डेस्क:
पावसाळ्याचे आगमन झाले आहे. पावसाळा हा काही जणांसाठी आनंदाचा ऋतू असतो, तर काही जणांसाठी डोकेदुखी. यात काही जणांना पावसाचा आनंद घ्यायचा असतो त्यांच्या खिशातल्या मोबाईलची चिंता त्यांना हा आनंद घेण्यापासून थांबवते. मात्र आता यापुढे असं होणार नाही. कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काही अशा TIPs ज्यामुळे पावसात भिजल्यानंतरही तुम्ही तुमचा मोबाईल व्यवस्थितपणे चालू करु शकाल. Divyamarathi.com तुम्हाला सांगणार आहे पाण्यात पडलेल्या मोबाईलला कशा प्रकारे वाळवावे आणि त्याला व्यवस्थितपणे चालू करण्यासंदर्भात माहिती. तसेच फोन पाण्यात भिजल्यावर कोणत्या गोष्टी करू नये याच्याही TIPs टीप्स आम्ही देऊ...

तर तयार व्हा.. ह्या TIPs जाणून घेण्यासाठी....
फोन भिजल्यावर काय कराल....
* TIP 1 - जर फोन पाण्यात भिजला असेल तर त्याला सर्वात पहिले स्वीचऑफ करा. जर फोन चालू करताना आतमध्ये पाणी राहिल्यास फोनमध्ये शॉटसर्कींट होण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे जेव्हा फोन पाण्यात पडला असेल, अथवा पावसात भिजला असेल तेव्हा त्याचे बटन चालू आहेत की नाही, स्क्रीन चालते की नाही हे मुळीच तपासायचे नाही, हे लक्षात असू द्या. अशा वेळी मोबाईल स्वीच ऑफ करणे हाच सर्वोत्तम उपाय असतो.

(फोटो: सर्व फोटो केवळ बातमीच्या सादरीकरणासाठी लावण्यात आले आहेत)