Home | Business | Auto | Honda India launch Grazia scooter with price 57,897

Honda नी 57,897 मध्ये लॉंच केली नवीन स्कूटर Grazia, हे आहेत फिचर्स

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2017, 05:29 PM IST

नवी दिल्ली- होंडा मोटरसायकल अॅण्ड स्कूटर इंडियाने नवीन होंडा Grazia 125 सीसी स्कूटर लॉंच केली आहे.

 • Honda India launch Grazia scooter with price 57,897
  नवी दिल्ली- होंडा मोटरसायकल अॅण्ड स्कूटर इंडियाने नवीन होंडा Grazia 125 सीसी स्कूटर लॉंच केली आहे. कंपनीने या स्कूरची किंमत ५७,८९७ रुपये (एक्स शोरूम दिल्ली) ठेवली आहे. नवीन Grazia सोबत होंडा टु-व्हीलरने यंग आणि अर्बन ग्राहकांना टारगेट केले आहे. स्टायलिश आणि मॉडर्न फिचर्ससह नवीन स्कूटर लॉंच करण्यात आली आहे. होंडाने Grazia ची बुकींग ऑक्टोबर अखेरपासून सुरु केली होती. या स्कूटरचा मुकाबला सुझुकी एक्सेस १२५, वेस्पा व्हीएक्स १२५ आणि अॅक्टिव्हा १२५ सोबत राहणार आहे.
  होंडा Grazia चे स्पेसिफिकेशन
  नवीन होंडा ग्राझियात १२४.९ सीसी एअर कुल्ड, ४ स्ट्रोक इंजिन आहे. अॅक्टिव्हा १२५ मध्येही हेच इंजिन आहे. दोन्ही इंजिन ८.२५ बीएचपी आणि १०.५४ एनएम टॉर्क जनरेट करतात. या स्कूटरला सीव्हीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह सादर करण्यात आले आहे. होंडाच्या दुसऱ्या स्कूटरप्रमाणेच या स्कूटरलाही होंडा ईको टेक्नॉलॉजीसह सादर करण्यात आले आहे. या फिचरने इंजिन फ्रिक्शन कमी होते आणि फ्युअल इफिशिअन्सी वाढते.
  पुढील स्लाईडवर वाचा... होंडा Grazia चे आणखी फिचर्स...

 • Honda India launch Grazia scooter with price 57,897
  इतर फिचर्स
  होंडा ग्राझियात एलईडी हॅंडलॅम्प आणि डिजिटल इंन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहेत. स्पीडोमीटर, ट्रिप मीटर, ओडोमीटर, फ्युअल गॅग, क्लॉक आणि टेकोमीटर यात डिस्प्ले करतात. या स्कूटरमध्ये ३ स्टेप ईको स्पीड इंडिकेटर आहेत. या शिवाय स्कूटरच्या इंटेरिअर पॅनलमध्ये लहान स्टोरेज स्पेस आणि युएसबी चार्जिंग पॉईंट आहे.
 • Honda India launch Grazia scooter with price 57,897
  लुकवर नजर
  होंडा ग्राझियात अलॉय व्हील्स, कॉम्बी ब्रेकिंग सिस्टिमसह फ्रंट डिस्क ब्रेक, टेलिस्कॉपिक फ्रंट फॉर्कस आणि ड्युअल पेंट स्कीम युज करण्यात आली आहे. या स्कूटरमध्ये डिजिटल डिस्प्लेसह रिव्हाईज इंन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे. होंडाच्या सध्याच्या मॉडेल्सपेक्षा तो वेगळा आहे. लेफ्ट हॅंड साईडवर छोटे स्टोरेज स्पेस आहे.
 • Honda India launch Grazia scooter with price 57,897
  स्टायलिश आणि मॉडर्न फिचर्ससह नवीन स्कूटर लॉंच करण्यात आली आहे.
 • Honda India launch Grazia scooter with price 57,897
  या स्कूटरचा मुकाबला सुझुकी एक्सेस १२५, वेस्पा व्हीएक्स १२५ आणि अॅक्टिव्हा १२५ सोबत राहणार आहे.
 • Honda India launch Grazia scooter with price 57,897
  होंडाच्या दुसऱ्या स्कूटरप्रमाणेच या स्कूटरलाही होंडा ईको टेक्नॉलॉजीसह सादर करण्यात आले आहे.

Trending