आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Honda लॉंच करणार क्रुझर लुकची किफायती बाईक, पॉवरफुल इंजिनसह अनेक वैशिष्ट्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- इतर ऑटोमोबाईल कंपन्यांप्रमाणे होंडा ही कंपनीही भारतात किफायती सुपरबाईक लॉंच करणार आहे. 2017 मध्ये रेबेल मॉडलच्या 500cc आणि 300cc बाईक बाजारपेठेत सादर केल्या जाणार आहेत. होंडा रिबेल एक स्मॉल डिस्प्लेसमेंट क्रुझर बाईक आहे. 1985 पासून ही बाईक तयार केली जाते.
दमदार इंजिन आणि क्रुझर लुकसह लॉंच होणार बाईक
होंडाने रेबेल 300 या बाईकमध्ये CBR300 आणि रेबेल 500 मध्ये CBR500 इंजिन लावले आहे. रेबेल 300 चे इंजिन 286cc चे सिंगल सिलिंडर इंजिन आहे. यात एकूण सहा गेअर देण्यात आले आहेत. यासह होंडाने रेबेल 500 ही लॉंच केली आहे. ती 471cc ची बाईक आहे. 45bhp सह या बाईकचे इंजिन 44Nm टॉर्क जनरेट करतो. भारतीय बाजारपेठेत रेबेल 300 ची किंमत 2.25 लाख रुपये तर रेबेल 500 ची किंमत 3.75 लाख रुपये राहण्याची शक्यता आहे. दोन्ही बाईकमध्ये 4 वॉल्व, DOHC फ्यूल इंजेक्टेड इंजिन लावले आहेत.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या दोन्ही बाईक्सचे कुल लुक फोटो....
बातम्या आणखी आहेत...