आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 MP सेल्फी कॅमेऱ्यासह HTC ने लॉन्च केला डिजायर 826 डुअल सीम स्मार्टफोन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅझेट डेस्क- मोबाइल हॅंडसेट बनवणाऱ्या HTC कंपनीने भारतात HTC ONE ME लाँच करून एक दिवसही होत नाही, तोच आता HTC डिझायर 826 डुअल सीम हॅंडसेट लाँच केला आहे. या फोनची किंमत भारतीय बाजारात 26990 रुपये एवढी आहे.

या व्हरायटीचा सिंगल सीम फोन कंपनीने, या वर्षीच्या एप्रिल महिन्यात भारतीय बाजारात लाँच केला होता. या स्मार्टफोनची किंमत 25900 रुपये एवढी ठेवण्यात आली होती. फोनमधील फीचर संदर्भात सांगायचे झाल्यास, या दोन्ही फोनमध्ये सारखे फीचर देण्यात आले आहे.
काय आहे यात खास
बूम साउंड स्पीकर्स
डुअल सीम असलेल्या या स्मार्टफोनमध्ये बूम साउंड स्पीकर्स देण्यात आले आहे. डिझायर 826 मध्ये व्हिडेओ पाहणाऱ्यांना आणि गाणी ऐकणाऱ्यांना चांगला अनुभव येईल, असा दावा कंपनीने केला आहे. स्पीकर्स बरोबरच या फोनसोबत डॉल्बी डिजिटल इयरफोन देखील देण्यात आले आहेत.

सेल्फी कॅमेरा
या फोनमध्ये HTC EYE हा स्मार्टफोन वापरल्यासारखाच अनुभव येईल. HTC EYE हा कंपनीने आणलेला असा स्मार्टफोन होता ज्याला 13 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला होता. आता डिझायर 826 मध्येही असा कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 4 मेगापिक्सलचा अल्ट्रापिक्सल फ्रंट कॅमेरा देखील दिला आहे. जो साधारणपणे 13 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेऱ्या सारखीच क्लिअरिटी देतो. या फोनचा 13 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याचा व्हेरिएंट देखील उपलब्ध आहे.
अॅंड्रॉइड 5.0
या फोनमध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमचे लेटेस्ट व्हर्जन अँड्रॉइड 5.0 लॉलीपॉप देण्यात आले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, या फोनचे काही विशेष फीचर्स-