नवी दिल्ली- भारतीय टेलिकॉम सेक्टरमध्ये Data War जुंपले आहे. रिलायन्स Jio ला टक्कर देण्यासाठी Idea Cellular कंपनीने नवा प्लान लॉन्च केला आहे. Idea ने अॅडिशनल फ्री डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंगची ऑफर दिली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, न्यू 4G हॅन्डसेट घेणा-याला न्यू प्लानमध्ये जास्तीचा डेटा मिळेल.
Idea कस्टमर्सला न्यू 4G हँडसेटवर 12 महिन्याकरिता 9,000 रुपयांपर्यत फ्री डेटा वापरायला मिळेल. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग करू शकणार ही ऑफर कंपनीच्या प्रत्येक नव्या ग्राहकाला असेल. Idea जवळ आता 18.5 कोटी यूजर्स आहेत.
- रिलायन्स Jio च्या एंट्रीनंतर Idea, Airtel, आणि Vodafone कंपनींना भारतात खूप कॉम्पिटिशन वाढलेली आहे.
- मुकेश अंबानींची रिलायन्स Jio कंपनीने मागील वर्षी सब्सक्राइबसाठी फ्री ऑफर सोबतच व्यवसाय चालू केला होता. कंपनी सतत युजर्सची संख्या वाढवत आहे.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, प्रीपेड ग्राहकांसाठी काय असणार ऑफर ...