आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात फेसबुक, व्हॉट्सअॅप बंद करावे का : सुनील मित्तल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली: राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वात अमेरिकेमध्ये संरक्षणवाद मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यावर भारतातील दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज सुनील भारती मित्तल यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. भारतात फेसबुक, गुगलसारख्या कंपन्या केवळ अमेरिकी असल्यामुळे त्यांना बंद करायला हवे का? अशी सरळ टीका त्यांनी अमेरिकी धोरणावर केली आहे. त्यांची कंपनी एअरटेलला कोणत्या एखाद्या विशिष्ट देशात प्रवेश करण्यास नकार दिला तर त्यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी वरील उत्तर दिले.  आमचा बिझनेस भारतीय बाजारावर आधारित असल्यामुळे अमेरिकी संरक्षणवादाची जास्त चिंता नसल्याचे त्यांनी सांगितले.
 
बातम्या आणखी आहेत...