आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्टफोन बाजारात भारत ठरेल ट्रेंडसेटर, अॅपल-सॅमसंगसारख्या होतील कंपन्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - जागतिक पातळीवर स्मार्टफोनचा पुरवठा करणाऱ्या साखळीचा भारतीय स्मार्टफोन कंपन्या येत्या काही वर्षांत महत्त्वाचा हिस्सा ठरणार आहेत. ज्याप्रमाणे सध्या अमेरिका स्मार्टफोन बाजरातील ट्रेंडसेटर आहे, त्याप्रमाणे भारत नवा ट्रेंडसेटर होणार आहे. ज्या वेळी तो दिवस येईल त्या वेळी भारतीय ब्रँड चीनमध्येही सर्वाधिक विक्री होणारा ब्रँड ठरेल. त्या वेळी भारतीय कंपन्या अॅपल, सॅमसंग किंवा चीनच्या हुवावे आणि झेडटीईप्रमाणे बनू शकतील.
भारताबाबत ही अप्रत्यक्ष स्वरूपातील अपेक्षा चीनमधील मीडियाने व्यक्त केली आहे.
“स्मार्टफोन बूम’च्या सुरुवातीच्या काळात सध्या भारत असल्याचे चीनमधील सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने लिहिले आहे. इतर विकसनशील देशांपेक्षा भारत खूपच वेगळा असून स्मार्टफोनच्या जगात तो “वास्तविक जागतिक पॉवर’ बनण्याची शक्यता आहे. सॉफ्टवेअरबाबत भारत खूपच शक्तिशाली आहे. येथील लोकसंख्यादेखील त्यासाठी अनुकूल आहे. भारतातील सरकारदेखील येथील उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन देत आहे. या सर्व बाबी स्थानिक कंपन्यांसाठी मैलाचा दगड ठरत आहेत.

विशेष म्हणजे ग्लोबल टाइम्सने चीनमधील स्मार्टफोन कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेच्या आधारावर हा निष्कर्ष काढला आहे. वृत्तपत्राने चिनी कंपन्यांना व्यवसायासाठी सल्लादेखील दिला आहे. वृत्तपत्राने लिहिले आहे की, फक्त भारतीय कंपन्यांसोबत नाही तर भारतीय लोकांसोबतही चिनी कंपन्यांनी सामंजस्य वाढवले पाहिजे. त्यामुळे कंपन्यांचा व्यवसाय कायम नफ्यात राहील. दोन वर्षांनी फोनमध्ये तीन ते चारच ब्रँडेड कंपन्या असणार आहेत. मात्र, त्यात चीनच्या किती कंपन्या असतील हा प्रश्न असल्याचे वृत्तपत्राने लिहिले आहे.

अॅपलचा उल्लेख करत वृत्तपत्राने लिहिले आहे की, अमेरिकी कंपनी भारतामध्ये मोठी खेळी खेळण्याचा प्रयत्न करत अाहे. ज्या भारतीयांनी अमेरिकेत शिक्षण घेतले आहे किंवा नोकरी केली आहे, त्यांना अमेरिकी जीवनशैली अावडते. त्यामुळे अॅपल त्यांची पहिली आवड असेल. अशा परिस्थितीत अॅपल आणि सॅमसंग चिनी कंपन्यांसमोर मोठे प्रतिस्पर्धी असतील.
चिनी कंपन्यांसाठी नफा मिळवणे अवघड
ग्लोबल टाइम्सने लिहिले आहे की, ज्या देशांमध्ये स्मार्टफोन बाजार तेजीने वाढत आहे, अशा मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. त्यामुळे चीनसारख्या शेजारील देशांच्या कंपन्यांना आपल्याकडे आकर्षित करणारे चुंबक हा देश बनला आहे. अनेक वर्षांच्या तेजीनंतर चीनमधील स्मार्टफोनचा बाजार आता स्थिरावला आहे. भारतात चिनी कंपन्या आल्यामुळे येथे स्पर्धा वाढली आहे. मात्र, किमतीच्या बाबतीत भारतीय कंपन्यांशी स्पर्धा करणे खूपच अवघड ठरणार आहे. चिनी कंपन्या काही नव्या मॉडेल्ससह विक्री वाढवू शकतात. तरीदेखील या बाजारात त्यांच्यासाठी नफा मिळवणे खूपच अवघड आहे.
बातम्या आणखी आहेत...