नवी दिल्ली - घराघरांतील, मंदिरांतील तसेच विविध संस्थांकडे असणारे सोने बँकेत ठेवल्यास आता व्याज मिळणार आहे. केंद्र सरकारने सुवर्ण कमाई (गोल्ड मोनेटायझेशन स्कीम) तसेच सोने सार्वभौम रोख्यांस (गोल्ड सॉव्हरेन बाँड) बुधवारी मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. सोने कमाई योजनेत सोने जमा करण्यासाठी दागिने वितळावे लागणार आहेत. याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळाने ध्वनिलहरी (स्पेक्ट्रम) व्यापार नियम शिथिल, व्हाइट लेबल एटीएम क्षेत्रात १०० टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी दिली आहे.
गोल्ड सॉव्हरेन बाँड
फिजिकल सोन्याची मागणी कमी करणे हा या रोख्यांचा मुख्य उद्देश. हे रोखे ५ ते ७ वर्षे मुदतीचे असतील. केवळ भारतीय कंपन्यांना हे रोखे खरेदी करता येतील. यात ५०० ग्रॅम पेक्षा अधिक सोने खरेदीची मर्यादा आहे. या रोख्यांवरील व्याजदर वेळोवेळी जाहीर होईल. रोखे डीमॅट किंवा कागदी फॉर्ममध्ये उपलब्ध असतील. पाच, १०, ५० आणि १०० ग्रॅम मूल्याचे रोखे जारी होतील. बँक, बँकेतर वित्तीय संस्था (एनबीएफसी), पोस्ट ऑफिस, एनएससीचे एजंट व इतर संस्था
रोख्यांसाठी पैसे जमा करतील
किंवा रोखे मोडू शकतील. कर्ज घेण्यासाठी कोलॅटरल स्वरूपात हे रोखे वापरता येतील. केवायसी नियम लागू राहतील. व्हाइट एटीमची संख्या वाढणार : व्हाइट लेबल एटीएम क्षेत्रात १०० टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला मान्यता दिली. यामुळे ग्रामीण भागात व छोट्या शहरांत एटीएमची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
स्पेक्ट्रम ट्रेडिंग नॉर्म्स :
स्पेक्ट्रमच्या ट्रेडिंग नियमात सरकारने शिथिलता आणली आहे. यामुळे टेलिकॉम कंपन्यांचा खर्च कमी होऊन आगामी काळात कॉल दर स्वस्त होण्याची शक्यता आहे.
पुढील स्लाइडवर वाचा काय आहे सुवर्ण कमाई योजना...