नवी दिल्ली- देशात चलनात असलेल्या नोटांमध्ये अशा काही नोटा आहेत की, त्यांची किंमत लाखों रुपयांच्या घरात आहे. या नोटा स्पेशल सीरीज, स्पेशल नंबर, मिस प्रिंट किंवा विशिष्ट सिग्नेचरच्या असू शकतात. अशा नोटांचा विविध वेबसाइटवर विक्री केली जाते. त्यातून लाखों रुपये कमावले जातात.
'786' सारखे लकी डिजिट (आकडे) असलेल्या नोटांना चांगली किंमत मिळते. लकी नंबर 1 ते 100 रूपयांच्या कोणत्याही नोटांवर असू शकतो. जर तुमच्याकडे अशा नोटा असतील तर तुम्हाला लाखों रूपये कमावण्याची संधी मिळू शकते. आम्ही
आपल्याला अशाच काही नोटांविषयी माहिती देत आहोत.
ई-बेवर लागते बोली
भारतीय चलनातील रेयर (दुर्मिळ) नोटांची ई-बेवर बोली लावली जाते. बोलीमध्ये वेबसाइटच्या माध्यमातून कोणालाही सहभाग घेता येतो. जर आपल्याजवळ विशेष सीरीजच्या नोटा असतील तर यामधे आपल्या नोटांचाही लिलाव करून लाखों रूपये कमाऊ शकतात. विशेष म्हणजे '786' डिजिट नोटांची किंमत एक ते तीन लाख रूपयांपर्यंत लावली जाते.
10 रुपयांची एक नोट 3300 रुपयांत विक्री
भारतीय नोटांवर आकडयांची सीरीज असते. परंतु काही नोटा अशा आहेत ज्यांच्या वरील बाजूला एक तर खालील बाजूवर वेगळीच सीरीज आहे. अशी वेगळया सीरीजची नोट वर फोटोमध्ये दिसत आहे. याची किंमत 3300 रूपये आहे.
पुढील स्लाइडवर वाचा विशिष्ट कॉइन आणि नोटांविषयी माहिती...