आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian origin Engineers Sue Apple; Told To Pay 1521 Corore Rupees

'अॅपल' पेटंटच्या वादात; दोन भारतीयांना बसेल 1521 कोटींचा दंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जगातील सर्वात मोठी आयटी टेक्नॉलॉजी कंपनी अॅपल पुन्हा एकदा पेटंटच्या वादात अडकली आहे. दोन भारतीय-अमेरिकी संशोधकांनी कंपनीने पेटंटच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. त्यावर अमेरिकेच्या एका फेडरल न्यायालयाने अॅपलला २३.४ कोटी डॉलर (जवळपास १,५२१ कोटी रुपये) दंड देण्याचा आदेश दिला आहे.

अॅपलवर व्हिस्कॉन्सिन विद्यापीठाच्या मायक्रोप्रोसेसर टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचा आरोप करण्यात आला आहे. या टेक्नॉलॉजीचे पेटंट या विद्यापीठातील संशोधकांनी आधीच मिळवलेले आहे. त्यामुळेच त्यांनी न्यायालयात अॅपलवर पेटंट प्रकरणी खटला दाखल केला होता.
या प्रकरणाी अॅपल या कंपनीच्या कम्प्यूटमध्ये प्रोसेसिंग आणि गती वाढवण्यासाठी वापरण्यात आलेले मायक्रोप्रोसेसर आपण तयार केलेलेच असल्याचा दावा व्हिस्कॉन्सिन एलुम्नी रिसर्च फाउंडेशनने (डब्ल्यूएआरएफ) केला आहे. या प्रकरणाचा तापास केल्यानंतर यामध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचा पुरावा मिळाल्यामुळेच हा निर्णय देण्यात आला असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.

या उत्पादनात केला वापर : दोन आठवडे सुरू असलेल्या या खटल्यामध्ये न्यायालयाला अॅपलच्या ए-७, ए-८ आणि ए -८ एक्स सिस्टिममध्ये चिप डिझाइनच्या नियमाचे उल्लंघन केल्याचे दिसून आले आहेत. त्यामुळेच न्यायालयाने अॅपलला डब्ल्यूएआरएफला दंडाच्या स्वरूपात १,५२१ कोटी रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.

टेक्नॉलॉजीच्या विकासाला ११ वर्षे : आमची टेक्नॉलॉजी सध्याच्या काळापेक्षा पुढील असल्याचे आमचे मत आहे, असे व्हिस्कॉन्सिन विद्यापीठाचे प्रो. गुरिंदर सोही यांनी सांगितले. जवळपास दोन दशकांआधी कम्प्यूटला ऑपरेट करण्यासाठी काय करावे लागेल याचा आम्ही विचार केला होता. या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही ११ वर्षांपासून काम करत आहोत. सोही यांच्या संघामध्ये पदवीचा विद्यार्थी आंत्रेस मोशोवोस, स्कॉट ब्रीच आणि तेरानी विजयकुमार यांचा समावेश आहे.