आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13MP सेल्फी कॅमेरा, 2GB रॅमसोबत लॉन्च झाला नवा स्मार्टफोन, किंमत 10,999 रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - US ची स्मार्टफोन कंपनी इनफोकसने त्यांच्या स्मार्टफोन सिरिजला वाढवत आता एक नवा स्मार्टफोन भारतीय बाजारात आणला आहे. कंपनीने दिल्लीमध्ये नुकतेच त्यांचा M530 स्मार्टफोन लॉन्च केला आहे.
कंपनीने M530 फ्लॅगशिप मॉडलची किंमत भारतीय बाजारात 10,999 रुपये एवढी ठेवली आहे. हा मोबाईल ई-कॉमर्स वेबसाईट स्नॅपडीलवरून फ्लॅशसेलच्या मार्फत विकला जाईल. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने 13 मेगापिक्सलचा फ्रंट आणि बॅक कॅमेरा दिला आहे.
इनफोकस मोबाईल्सचे भारताचे हेड सचिन थापर हे लॉन्चींगच्या वेळी उपस्थित होते. सचिन म्हमाले की, "अनेक संशोधन केल्यानंतर आणि भारतीय बाजारपेठेचा बारकाईने अभ्यास केल्यावर आम्हाला असे समजले की, भारतातील आजच्या यंग जनरेशनला स्मार्टफोनकडून दोन गोष्टींची अपेक्षा आहे. एक तर पॉवरफूल फीचर्स आणि दुसरे म्हणजे चांगला कॅमेरा ज्यांने सेल्फी काढता येईल. आम्ही या स्मार्टफोनमध्ये दोन्ही फीचर्स दिले आहेत. आम्हाला अशी अपेक्षा आहे की, भारतीय युजर्स या फोनला पसंद करतील.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इनफोकस M530 चे फीचर्स...