आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Apple IPhone 8 Live Updates: IPhone X, IPhone Plus Specifications All You Need To Know

iPhone8, 8Plus आणि iPhoneX लॉन्च, फेस आयडी आणि वायरलेस चार्जिंगचे फीचर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- कॅलिफोर्नीयाच्या कूपर्टिनोमधअये सुरू असलेल्या अॅपलच्या मेगा इव्हेंटमध्ये नविन iPhone8 आणि 8Plus आणि अॅनिवर्सरी एडिशन iPhoneX लॉन्च करण्यात आला आहे. चेहऱ्याने अनलॉक होणाऱ्या या फोनची किंमत 699 डॉलर (जवळपास 45 हजार रुपये) पासून सरू होईल. यासोबतच नविन अॅपल वॉच, अॅपल 4K टीव्हीही लॉन्च करण्यात आली. सीइओ टिम कुक यांनी ट्विट करून आज अॅपलसाठी अत्यंत मोठा दिवस असल्याचे सांगितले आहे. फाउंडर स्टीव्ह जॉब्स यांचे स्वप्न पूर्ण करत अॅपल कंपनीने स्पेसशिप कॅम्पसच्या थिएटरमध्ये पहिल्यांदा या इव्हेंटचे आयोजन केले आहे. आयफोनच्या 10व्या वर्धापनदिनी अशी पहिलीच वेळ आहे जेव्हा एकदाच 3 iphone लाँच करण्यात आले. परंतु, विश्लेषकांच्या मते, iPhoneX मध्ये लेस डिझाइन, वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी आणि वेगवान प्रोसेसरशिवाय कोणतेही असे युनिक फीचर नाही. कारण, यातील अनेक फीचर अॅड्रॉइड फोनमध्ये यापुर्वीच दिसले आहेत.
 
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचे आभार मानण्यासाठी टिम कुक सहाव्यांदा स्टेजवर आले. iPhoneX हा जगातील सर्वोकृष्ट स्मार्टफोन आहे, असा उल्लेख त्यांनी पुन्हा एखदा केला. यावेळी त्यांनी स्टिव जॉब्स यांची आठवण काढली. त्यांच्या मागे स्टीव यांचे प्रसिध्द वाक्य लिहिले होते. मी त्या आविष्कारावर विश्वास ठेवतो ज्यामध्ये लोक काहीतरी आश्यर्यकार वस्तू बनवून संपूर्ण मनुष्यजातीसाठी काहीतरी स्तूतीचे काम करून जातात.
 
आयफोनसोबत वॉच, टीव्हीचेही नवे व्हर्जन सादर 
किंमत :
६४ हजार रु. पासून ६४, २५६ जीबीमध्ये उपलब्ध 
- २७ऑक्टो.पासून बुकिंग, नोव्हें.पासून विक्री, भारतात तूर्त नाही. 

बेझल-लेस: आयफोन-१०मध्येऑल स्क्रिन फ्रंट आहे. मागची बाजूही काचेची. सर्जिकल ग्रेड स्टील, पाणी धूळ प्रतिबंधक. स्पेस ग्रे आणि सिल्व्हर रंगात उपलब्ध. 
- शाओमीएमआय मिक्स, एलजी-क्यू ऑनरमध्ये ही फीचर्स. सॅमसंग गॅलेक्सी नोट पण बेझल-लेस आहेत. 

फेस आयडी: यूजरनेपाहताच ओपन होईल. अंधारातही चेहरा ओळखेल. फेस डेटा फोनमध्येच सुरक्षित राहील. 
- हेतंत्रज्ञान सॅमसंग गॅलेक्सी एस-८ आणि नोट-८ मध्येही. 

ओएलईडी स्क्रिन: अोएलईडीसुपर रेटिना डिस्प्ले. स्क्रिनचा आकार ५.८ इंच. हलका, उजळ आणि चपट्या आकारात. 
- शाओमी मिक्समध्येही ओएलईडी स्क्रिन. आकार ६.४४ इंच. 
 
टीवी 4 के: 7 जणांचे गेमिंग 
एचडीपेक्षा 4 पट जास्त पिक्सेल. मात्र हे तंत्रज्ञान आधीपासूनच बाजारात आहे.प्रोसेसर दुप्पट, ग्रॅफिक्स पटींनी वेगवान असेल. 

वॉच-3 : 4 काेटी गाणी 
4 कोटी गाणी स्टोअर. जीपीएस, स्विमप्रूफ. सिरी असिस्टंट. हृदयगती वाढली तर नोटिफिकेशन. सेल्युलर व्हर्जन 399 डॉलरमध्ये. 
 
अॅपल मेगा इव्हेन्टमधील महत्वाचे मुद्दे...
1 > अॅपलने एकदाच पाच उत्पादने बाजारात आणली आणि पुन्हा एकदा जगाला आश्यर्याचा धक्का दिला. तीन आयफोन एकसोबत लॉन्च करून सर्व जुने ट्रेन्डस् बदलून टाकले. यावेळी जुने व्हर्जन अपग्रेड करण्याऐवजी अॅपलने थेट iPhone X लॉन्च केला. हा जगातील सर्वात आत्याधूनिक स्मार्टफोन आहे.

2 > सीईओ टीम कुक आणि त्याची टीमने आर्टिफिशिअर इंटेलिजन्स, अत्याधुनिक वास्तव, कॅमेरा, व्हिडीओ आणि सुरक्षा या फीचरवर लक्ष केंद्रित केले आहे, यामुळे अॅपलचे उत्पादन सर्वात खास बनले आहे. मंगळवारी लाँच केलेल्या सर्व पाच प्रोडक्टसमध्ये वापरकर्त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

3 > अॅपलचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या स्वप्नांना नवीन उंचीवर पोहचवतांना अशा तंत्रज्ञानाचा सांगड घालण्यात आली आहे, ज्यासाठी युजर्स अधिकची किंमत मोजण्यास तयार होतील. यावेळी अॅपलचे सर्व उत्पादने त्यांच्या जुन्या प्रकारांपेक्षा जास्त महाग आहेत आणि त्यासाठीचाप्रतीक्षा कालावधी देखील अधिक आहे. 

4 > iPhone X च्या फेस आयडी या फिचरसाठी अॅपलने आपली पुर्ण शक्ति पणाला लावली आहे. iPhone X चा वापर करणाऱ्या युजर्सच्या सहमतीशीवाय दहा लाख लोकांमधूनही कदाचीत एखादा व्यक्ती फोन अनलॉक करू शकेल, असा दावा करण्यात आला आहे.
 
5 > वायरलेस चार्जिंगसोबत येणारे हे 5 फोन, केबल लावून चार्जिंग करण्याचा त्रास दुर करणार आहेत. Qi चार्जिंग कॉन्सेप्टसह वायरलेस चार्जिंगला एअरपॉवर नाव देण्यात आले आहे. पुढील तीन महिन्यात हे सर्वांपर्यंत पोहोचेल.
 
6 > जगातील सर्वांच्या पसंतीला उतरेली अॅपल वॉचला 4 कोटी गाण्यांच्या लाइव्ह स्ट्रीमींगपर्यंत पोहचून, LTE सेल्यूलर नेटवर्क सपोर्ट, पूर्णपणे वॉटर प्रूफ-स्वीम प्रुफ सपोर्टही मिळाले आहे. फिटनेसच्या काळजीतून असे काही इनोव्हेशन करण्यात आले आहे की, की घड्याळ घलण्याचा अनुभवच बदलून जाईल.

7 > अॅपलने TV पाहण्याच्या अनुभवालाही 4K HDR सोबत अधिक प्रशस्थ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. अॅपलचे जूने TV बी ऑटो अपग्रेड होऊ शकणार आहेत आणि सोबतच या TV वर जगभरातील बेस्ट क्वालिटी मूवीज आणि इतर प्रोग्रामस HD च्या किमतीत मिळतील. यासाठी Netflicks आणि अमेझॉनला कंटेट पार्टनर बनवणे एक मोठे पाऊल आहे.

8 > इमोजी आत एनिमोजी बनतील. म्हणजे निर्जिव आयकॉन आता सजिव बनतील. युजर्स आपल्या आवाजात त्यांना रेकॉर्ड करू शकेल आणि ज्याला पाठवायचे आहे, तो तुमचा आवाज ऐकू शकेल. म्हणजे असे होइल की तुम्ही हसाल, तर बनवलेला इमोजीह हसेल आणि तुम्ही रडलात तर तुम्ही बनवलेला इमोजीही रडेल.
 
9 > वॉटर आणि मायक्रोस्कोपिक लेवलवर डस्ट रेजिस्टन्स, डुअल रिअर कॅमेरा, 3D टच आणि ट्रु टोन डिस्प्ले, आतापर्यंतचा सर्वात जास्त पॉवरफुल आणि स्मार्ट A11 बायोनिक चिप, 7,000 सीरीज अॅल्युमिनिअम, लेजर वेल्डेड स्टील कॉपर स्ट्रक्चरसाख्या वैशिष्ट्यांसह अॅपल ब्रॉन्डचे आकर्षण हे एख वेगळेच कॉम्बिनेशन आहे.

10 > ही अशी पहिली वेळ आहे, जेव्हा अॅपलच्या लॉन्चिंग इव्हेंटच्या आधी जेवढ्या गोष्टी समोर आल्या होत्या, त्या सर्व खऱ्या निघाल्या. फीचर्सही लीक झाले आणि इव्हेंटनंतर ते खरेही सिद्ध झाले.
 
अशी असेल नव्या प्रोडक्टसची किंमत, पी-ऑर्डर आणि विक्री:
विक्री: 3 नोव्हेंबरपासून

आयफोन 8 (64GB)
किंमत:
699 डॉलर (जवळपास 45 हजार रुपयांपासून शुरू)
प्री-ऑर्डर: 15 सप्टेंबरपासून
विक्री: 22 सप्टेंबरपासून

आयफोन 8 प्लस (64GB)
किंमत:
799 डॉलर (52 हजार रुपयांपासून शुरू)
प्री-ऑर्डर: 15 सप्टेंबरपासून
विक्री: 22 सप्टेंबरपासून

अॅपल टीवी 4K (32GB)
किंमत:
179 डॉलर (11462 रुपयांपासून शुरू) 
प्री-ऑर्डर: 15 सप्टेंबरपासून
विक्री: 22 सप्टेंबरपासून

अॅपल वॉच सीरीज 3
किंमत:
329 डॉलर (जवळपास 21,062 रुपयांपासून शुरू) 
प्री-ऑर्डर: 15 सप्टेंबरपासून
विक्री:19 सप्टेंबरपासून
 
हे आहेत वैशिष्टय...
> iphone8 अॅपलचा पहिला अशा डिव्हाइस आहे, ज्यात डुअल कॅमेरा आणि A11 चिप असेल. आठव्या जनरेशनच्या या हॅन्डसेटला AR चा म्हणजे, आगुमेन्टेड रिअॅलिटीचा सपोर्ट आहे. दोन्हीही प्रकारचे हॅन्डसेट वायरलेस चार्जिंग सुविधा असेल. 
 
> अशा चार्जिंग फीचरसोबत पहिल्यांदाचा येत असलेले iphone8 आणि 8 Plus साठी दावा करण्यात येत आहे की, यामध्ये 12 मेगापिक्सेल कॅमेरा आणि व्हिडिओची क्वालिटी जगात सर्वोत्तम असेल. या सिरिजच्या फोनमधून सर्व प्रकाच्या प्रकाशातून फोटो घेता येतील.
 
> 64 जीबी आणि 256 जीबीच्या दोन रूपांबरोबर iPhone Xची किंमत $ 999 पासून सुरू होईल. प्री-ऑर्डर 27 ऑक्टोबर पासून सुरू होईल आणि ते स्टोअरमध्ये 3 नोव्हेंबरपासून उपलब्ध होईल.
 
> यासह, अॅपल आयफोनने पहिल्यांदा तिसऱ्या प्रकारचा iPhone X नावाने लॉन्च केला आहे. विना होम बटण, फेस आयडी, सुपर रेटिना OLED स्क्रीन डिस्प्लेसोबत, आयफोनच्या विशेष X व्हेरिएन्टला 10 व्या वर्धापनदिनाचे विशेष उत्पादन म्हणून संबोधले जात आहे. अन्य उल्लेखनीय फीचर्समध्ये - HDR कलर्स, डॅल्बी व्हिजन, 3D टच आणि टच-टोन टेक्नॉलॉजी, iPhone Xला जगातील सर्वात प्रगत स्मार्टफोन बनवते.
 
> सिल्वर आणि स्पेस ग्रे रंगात iPhone 8 आणि 8 Plus मार्केटमध्ये उतरवण्यात आले आहेत. 64 जीबी फोनसाठी $699 आणि 32 जीबी फोन $649 मध्ये उपलब्ध असेल. प्री-ऑर्डर 15 सप्टेंबर पासून करता येऊ शकेल. तर विक्री 22 सप्टेंबरपासून सुरू होईल.
 
> iPhone X से आतपर्यंतची सर्वोत्कृष्ठ फोटोग्राफी आणि 4K व्हिडिओग्राफी करता येवू सकते. कारण यात दोन्ही कॅमेऱ्यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन फीचर देण्यात आले आहे.
 
> ग्लास फिनिशिंगसह, 64GB  आणि 256GBच्या दोन प्रकारच्या फोनसह iPhone Xची किंमत $ 999 पासून सूरू होईल. प्री-ऑर्डर 27 ऑक्टोबर पासून सुरू होईल आणि ते स्टोअरमध्ये 3 नोव्हेंबरपासून उपलब्द होण्यास सुरूवात होईल. कंपनीने हा फोन बाजारात आणण्यासाठी आतापर्यंतची सर्वात आक्रमक योजना तयार केली आहे आणि पहिल्याच दिवशी 60 देशांमध्ये पसरलेल्या अॅपल स्टोअरमध्ये हे उपलब्ध होण्यास सुरुवात होईल.
 
> नवीन iPhone X चे फेस आयडी फीचर हे जगभरातील सुमारे 15 हजार अभियंत्यांच्या कष्टाचे परिणाम आहे. याच्या मदतिने वापरकर्ता त्याच्या चेहऱ्याने आयफोन अनलॉक करू शकेल. हे फीचर डिव्हाइस पूर्णपणे सुरक्षित ठेवेल आणि डिजिटल पेमेन्टसाठी अॅपला सपोर्टदेखील करेल. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे की, हे फीचर अंधारातही चेहऱ्याची ओळख करेल.
बातम्या आणखी आहेत...