Home »Business »Gadget» Foldable Smartphone May Launch Before Diwali

हा आहे भारतातील पहिला फोल्डेबल स्मार्टफोन, फिचर्सने परिपूर्ण असेल हा फोन

दिव्य मराठी वेब टीम | Oct 03, 2017, 11:18 AM IST

नवी दिल्ली -सध्या स्मार्टफोन दिवसेंदिवस बदलतोय. दररोज नवनवे तंत्रज्ञान स्मार्टफोनला आणखी स्मार्ट करतोय. त्यामुळे स्टोरेज क्षमता, रॅम, प्रोसेसर याशिवाय त्याच्या लुकलाही अनन्य साधारण महत्त्व आले आहे. सॅमसंग कंपनीने 2018 मध्ये फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात सादर करण्याची घोषणा केली होती. मात्र, झेडटीई या कंपनीकडून 17 ऑक्टोबरला अनोखा फोल्डेबल फोन लाँच करण्याची तयारी केली आहे.
अहवालानुसार, हा पहिला स्मार्टफोन ज्याचा डिस्प्ले फोल्डेबल असेल. या कंपनीने प्रोटोटाईप डिव्हाईसचा फोटोही लीक केला आहे. या फोटोत हा फोन फोल्डिंग डिस्प्लेसह दाखविण्यात आलाय. मात्र या फोनच्या रॅम, रोम, कॅमेरा आणि प्रोसेसरबद्दल अधिक माहिती देण्यात आली नाही. मात्र, स्मार्टफोनचे सर्व फिचर्स यात असतील, हे नक्की.

Next Article

Recommended